Kondhwa Dafanbhumi | कोंढव्यातील दफन भूमीचा प्रस्ताव अखेर रद्द! | प्रशासनाच्या भूमिकेवरून मात्र संभ्रम

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

Kondhwa Dafanbhumi  | कोंढव्यातील दफन भूमीचा प्रस्ताव अखेर रद्द!  | प्रशासनाच्या भूमिकेवरून मात्र संभ्रम

Kondhwa Dafanbhumi | कोंढव्यातील सर्वे नं 44 (Survey No 44 Kondhwa) या भागात दफन भूमी करण्याचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे(Pramod Nana Bhangire), माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar BJP)  आणि लोकांच्या मागणीवरून  हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. भानगिरे यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला होता. असे असले तरी महापालिका प्रशासनाच्या (PMC Pune) भूमिकेबाबत मात्र संभ्रम व्यक्त होत आहे. कारण संबंधित जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. असे असताना प्रशासनाने दफनभूमी करण्यासाठी मंजूरी कशी दिली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. (Pune Municipal Corporation)
कोंढव्यातील साधारणतः १० ते १५ हजार हिंदू लोकवस्ती असलेल्या सर्वे नं ४४ या भागात, लहान

मुलांच्या खेळासाठी असलेले फुटबॉलच्या मैदानासाठी महानगरपालिकेने ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून
दिला होता. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेकडे संबंधित ठिकाणी मुस्लिम समाजाची दफनभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता. याच पार्श्वभूमीवर आरक्षित जागेवर दफनभूमी करण्याला मंजूरी दिली होती. आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक गफूर पठाण, परवीन शेख, हमिदा सुंडके यांनी मागणी केली होती. याबाबत अमेनिटी स्पेस कमिटीच्या बैठकीसमोर (PMC Amenity Space Committee) प्रस्ताव ठेवण्यात आला होता. समितीने यास मंजूरी दिली. (Pune Municipal Corporation)

मात्र यामुळे स्थानिक लोकांमध्ये मात्र चांगलीच नाराजी पसरली होती. खेळाचे मैदान करण्याची मागणी नागरिक करत होते. त्यामुळे मग माजी आमदार योगेश टिळेकर यांनी पुन्हा प्रशासनाला पत्र देत दफनभूमीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. टिळेकर यांनी म्हटले होते कि अनावधानाने आम्ही दफनभूमीची मागणी केली होती. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील क्रीडांगण आरक्षण असल्याची गोष्ट आमच्या निदर्शनास आणून दिली नाही. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरून देखील संभ्रम निर्माण होत आहे.  त्यांनंतर टिळेकर यांनी पाठपुरावा केला. यावेळी त्यांना शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी देखील सहकार्य केले
दरम्यान याबाबत प्रमोद नाना भानगिरे यांनी देखील हा विषय उचलून धरला होता. स्थानिक लोकांच्या मागणीवरून हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी भानगिरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून दफनभूमीचा प्रस्ताव रद्द झाला आहे. त्या ठिकाणी आता क्रीडांगणंच होईल. याबाबत स्थानिक नागरिकांकडून देखील स्वागत करण्यात आले आहे.
कोंढवा खुर्द सर्वे क्रमांक 44 येथे क्रीडांगणाच्या जागी मुस्लिम दफनभूमी मंजूर करण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आणला होता. ही बाब स्थानिक नागरिकांनी  लक्षात आणून देताच मी महानगरपालिका आयुक्तांना वस्तुस्थिती विशद करून तात्काळ दफनभूमीचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत चर्चा केली.  तसेच आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्यानुसार पाठपुराव्याला यश आले असून दफनभूमीचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.
प्रमोद नाना भानगिरे, शहर प्रमुख, शिवसेना