Departmental Examination | PMC Pune | विभागीय परीक्षेसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर!   | तिन्ही पेपर  लेखी घेण्याबाबत आग्रह 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

विभागीय परीक्षेसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर!

| तिन्ही पेपर  लेखी घेण्याबाबत आग्रह

पुणे महानगरपालिका (PMC Pune) प्रशासनाकडील लेखनिक संवर्गासाठी विभागीय परीक्षा (Departmental Examination) आयोजित करण्यात आली आहे. ही  परीक्षा पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मधील परिशिष्ट ३ पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी  (अर्हताकारी विभागीय परीक्षा) नियम २०१४ यामधील नियमानुसार व तरतुदीनुसार पुणे मनपा प्रशासनाकडील लेखनिकी संवर्गातील दि. ३१.७ २०२२ अखेर नेमणूक झालेल्या सेवकासाठी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. दरम्यान परीक्षेचे तिन्ही पेपर हे लेखी घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (pune municipal corporation)

पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मधील परिशिष्ट ३ पुणे महानगरपालिका कर्मचा-यांसाठी (अर्हताकारी विभागीय परिक्षा) नियम २०१४ यामधील नियमानुसार व तरतुदीनुसार पुणे मनपा प्रशासनाकडील लेखनिकी संवर्गातील दि. ३१.०७.२०२२ अखेर नेमणूक झालेल्या कर्मचा-यांसाठी विभागीय परिक्षा आयोजित करणेबाबत मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार विभागीय परीक्षेसाठी प्रशिक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. विभागीय परीक्षेसाठी सेवकांची नावे समाविष्ट करणेबाबत, चतुर्थश्रेणीतून लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती झालेल्या व प्रश्नपत्रिका क्र. १ उत्तीर्ण असलेल्या सेवकांना प्रश्नपत्रिका क्रमांक १ उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळणेबाबत तसेच शा.नि.क्र. संकीर्ण- २३१८/प्र.क्र.३/का. १७ दि. ११.०८.२०२२ नुसार विभागीय परिक्षेतून सूट मिळणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार विभागीय परीक्षेसाठी पात्र सेवकांचे नावाची प्रश्नपत्रिकानिहाय नोंद करण्यात आली आहे. विभागीय परीक्षेतून सुटीस पात्र ठरणारे सेवक सोडून विभागीय परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका १, प्रश्नपत्रिका २, प्रश्नपत्रिका ३ निहाय पात्र ठरणाऱ्या सेवकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. (Departmental examination)

प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार प्रश्नपत्रिका 1 साठी 422 सेवक,  2 साठी 602 तर  3 साठी 596 सेवक पात्र होत आहेत. त्यानुसार लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. (PMC Pune)
दरम्यान परीक्षेचे तिन्ही पेपर हे लेखी घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मागणीनुसार सेवाप्रवेश नियमावली २०१४ मधील परिष्ट ३ यामधील पुणे महानगरपालिका कर्मचान्यांसाठी विभागी परीक्षा नियम २०१४ मधील नियम ४ मधील (ब) पुणे महानगरपालिका सेवाभरती नियम २०१४ नुसार नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांची नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून ४ वर्षात ३ संधीमध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.  सध्या आपल्या महानगरपालिकेला ७ वा वेतन आय लागू झाला आहे. त्यामुळे सर्वांचे वेतनात भरपूर वाढ झालेली आहे. आपली महानगरपालिका अ दर्जाची आहे. यासाठी आपले महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाजही त्याच दर्जाचे असयाला पाहिजे. यासर्व गोष्टी विचार केला असता लेखनिक संवर्ग हा हुशार कायद्याचे माहिती असणारा, व प्रशासकीय सर्व कामकाजा माहिती असणारा पाहिजे. म्हणून लेखनिक संवर्गसाठी असणारी विभागीय परीक्षचे तिन्ही पेपर लेखी घेण्यात यावी. अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे. (Departmental examination)