Maratha Reservation Survey Pune | Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या प्रगणक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती मानधन मिळणार? जाणून घ्या

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Maratha Reservation Survey Pune | Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या प्रगणक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती मानधन मिळणार? जाणून घ्या 

Maratha Reservation Survey Pune | Officers and Enumerators Payment | पुण्यात पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) प्रगणकाद्वारे मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. 2 फेब्रुवारी म्हणजे विहित कालावधीत 14 लाख 30 हजार घरांचा सर्वे झाला आहे. 23 जानेवारी पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण (Maratha Reservation Survey in Maharashtra) सुरु करण्यात आले होते. (Maratha Reservation News)

| 3 हजारहून अधिक प्रगणकाची नियुक्ती

या कामासाठी  महाराष्ट्र  शासनाने महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग  आयोगाकडे (Maharashtra State Commission for Backward Classes) मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे  काम सोपवले होते. त्यानुसार पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण झाले आहे.   सर्वेक्षण 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या 3 हजाराहून प्रगणकामार्फत (Enumerators) पूर्ण करण्यात  आले आहे. सदरील  सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप MSBCC वर livedata entry मार्फत  करण्यात आले. (Pune PMC News)

दरम्यान सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या प्रगणक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कामाचे मानधन मिळणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानेच परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार हे मानधन मिळणार आहे.

1. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, उपजिल्हाधिकारी, उपायुक्त, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले वर्ग 2 व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांना त्यांच्या एका महिन्याच्या मूळ वेतनाच्या 50% इतकी रक्कम दिली जाणार आहे.

2. सर्वेक्षणाचे काम करणारे पर्यवेक्षक (Supervisor) आणि प्रगणक (Enumerator) यांना प्रत्येकी 10 हजार रुपये आणि प्रशिक्षणाकरिता प्रवास भत्ता 500 रुपये.