MHADA | Stamp Duty Amenity Scheme | म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील अडथळे हटणार | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र
Spread the love

MHADA | Stamp Duty Amenity Scheme | म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील अडथळे हटणार | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

– प्रभाग दोन मध्ये राबविलेल्या ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद

 

MHADA | Stamp Duty Amenity Scheme | महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३’चे (Stamp Duty Amenity Scheme) पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन (PMC Ward no 2) मध्ये यशस्वी आयोजन करण्यात आले. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांच्या पुढाकाराने याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी ४०० थकीत मुद्रांक शुल्क म्हाडा ची प्रकरणे मार्गी लावली. त्यामुळे अभिहस्तांतरणाचा मार्ग मोकळा होऊन प्रभाग दोन मधील म्हाडाच्या इमारत पुर्नविकासातील अडथळे हटणार आहेत. (MHADA | Stamp Duty Amenity Scheme)

महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३’ राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अभियानाचे पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील हिंदू संस्कृती संवर्धन मंच येथे डॉ. धेंडे यांच्या पुढाकाराने आयोजन केले होते.

या वेळी म्हाडाचे प्रवीण वाघमारे, गोडे साहेब, ॲड. सराफ, ॲड. प्रदीप पाटील, मुद्रांक शुल्क विभागाचे प्रशासकीय अधिकारी मंगेश खामकर, संतोष हिंगणे आदींसह ३२ जणांची समिती या उपक्रमासाठी सहभागी झाले होते. या बरोबरच प्रभागातील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती चे अजय बल्लाळ , संयुक्त संघ चे डि के जाधव , नामदेव वेताळ, समतानगर गाळेधारक महासंघाचे सचिव शिवाजीराव ठोंबरे , हिंदु संस्कृती चे दिलिप महस्के , प्रेरणा जेष्ठ नागरिक संघ चे सांडभोर , दिघे , मेजर रणपिसे , त्रिरत्न संघ चे रत्नदिप हिरवे , पथारी संघटने चे विजय कांबळे , गजानन जागडे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील म्हाडाच्या इमारत पुनर्विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याला आणखीन गती मिळण्यासाठी शासनाची महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३’ प्रभागात राबविण्यात आली. इमारतीचे अभिहस्तांतरण करणे हे म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील महत्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक गाळेधारकांनी थकीत मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३’ राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील निष्पादित केलेले आणि नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडामध्ये या अभय योजनेत सवलत देण्यात आलेली आहे. ही योजना १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. सदर योजनेसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात अर्ज करता येतील. अर्जाचा नमुना या विभागाच्या संकेतस्थळावर (igrmaharashtra.gov.in) तसेच सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे. सदर योजनेची सविस्तर माहिती विभागच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती या वेळी माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांनी दिली.

——–

शासन आपल्या दारी हा सक्षम उपक्रम राज्य सरकार राबवित आहे. याचा प्रभागातील नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन मी या कार्यक्रमावेळी केले. मुद्रांक शुल्क थकीत असेल तर अभिहस्तांतरण करण्यात अडथळे येतात. त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास होणार नाही. त्यामुळे आणखीन नागरिकांनी या मध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका