Alandi Yatra | आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीएमएल कडून जादा बसेसचे नियोजन

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र
Spread the love

आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीएमएल कडून जादा बसेसचे नियोजन

कार्तिकी एकादशी व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त श्री. क्षेत्र आळंदी,
यात्रेसाठी १७ ते २३ नोव्हेंबर या कालावधी करिता मार्गावरील ९७ व जादा २०३ सर्व मिळून ३०० बसेस देण्यात येत असून दिनांक १९ ते दिनांक २२/११/२०२२ या चार दिवसा करिता रात्रौ बससेवा गरजेनुसार देण्यात येणार आहे. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरीत करून ते काटेवस्ती येथून संचलन करण्यात येत आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या रात्रौ १० वा. नंतर जादा बससेवेसाठी (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकिट दरा पेक्षा रूपये ५/- जादा तिकिट दर आकारणी करण्यात येईल. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, जेष्ठ नागरिक व इतर पासधारकास यात्राकालावधीत रात्रौ १० वा. नंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही.
उपरोक्त आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी जादा बससेवा देणे गरजेचे आहे. सदरची गरज ही महामंडळाकडील सध्याच्याच बसेसमधुन पूर्ण करणे भाग पडत आहे. यासाठी शहरातील बसमार्गावरील संचलनात असलेल्या बसेसमधूनच काही बसेस कमी करून गरज भागविण्यात येईल. त्याचप्रमाणे आळंदी मार्गावरील मार्ग क्रमांक २६४ भोसरी ते पाबळ व मार्ग क्रमांक २५७ आळंदी ते मरकळ हे मार्ग यात्रेच्या काळात संपूर्णत: बंद राहतील. तरी संबंधित मार्गावरील प्रवाशी नागरिकांनी पी.एम.पी.एम.एल. ला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.