Koregaon-Bhima | पीएमपीएमएल कडून कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पीएमपीएमएल कडून कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दि. १ जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. कोरेगांव-भिमा येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातून तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी तसेच येणारी वाढीव प्रवासी संख्या विचारात घेवून परिवहन महामंडळाच्या वतीने ३१ डिसेंबर  व १ जानेवारी रोजी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ०९.०० ते १ जानेवारी रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत तुळापूर फाटा,
लोणीकंद कुस्ती मैदान येथून ४० बसेस, वढू फाटा (इनामदार हॉस्पिटल) ते वढू करिता ५ बसेस व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते भिमा कोरेगांव पर्यंत ३५ बसेस अशा एकूण ८० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दि. ०१/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, फुलगाव शाळा ते पेरणे टोल नाका पर्यंत १४० बसेस व शिक्रापूर रोड (तोरणा हॉटेल) ते भिमा कोरेगांव पर्यंत ११५ बसेस आणि वढू फाटा ते वढू पर्यंत २५ बसेस अशा एकूण २८० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध स्थानकांवरून प्रवास भाडे आकारणी करून जादा बसेसचे नियोजन देखील करण्यात आले आहे.

Alandi Yatra | आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीएमएल कडून जादा बसेसचे नियोजन

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीएमएल कडून जादा बसेसचे नियोजन

कार्तिकी एकादशी व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त श्री. क्षेत्र आळंदी,
यात्रेसाठी १७ ते २३ नोव्हेंबर या कालावधी करिता मार्गावरील ९७ व जादा २०३ सर्व मिळून ३०० बसेस देण्यात येत असून दिनांक १९ ते दिनांक २२/११/२०२२ या चार दिवसा करिता रात्रौ बससेवा गरजेनुसार देण्यात येणार आहे. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरीत करून ते काटेवस्ती येथून संचलन करण्यात येत आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या रात्रौ १० वा. नंतर जादा बससेवेसाठी (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकिट दरा पेक्षा रूपये ५/- जादा तिकिट दर आकारणी करण्यात येईल. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, जेष्ठ नागरिक व इतर पासधारकास यात्राकालावधीत रात्रौ १० वा. नंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही.
उपरोक्त आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी जादा बससेवा देणे गरजेचे आहे. सदरची गरज ही महामंडळाकडील सध्याच्याच बसेसमधुन पूर्ण करणे भाग पडत आहे. यासाठी शहरातील बसमार्गावरील संचलनात असलेल्या बसेसमधूनच काही बसेस कमी करून गरज भागविण्यात येईल. त्याचप्रमाणे आळंदी मार्गावरील मार्ग क्रमांक २६४ भोसरी ते पाबळ व मार्ग क्रमांक २५७ आळंदी ते मरकळ हे मार्ग यात्रेच्या काळात संपूर्णत: बंद राहतील. तरी संबंधित मार्गावरील प्रवाशी नागरिकांनी पी.एम.पी.एम.एल. ला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Extra buses by PMPML | गणेशोत्सव कालावधीत पीएमपीएमएल कडून ६५४ जादा बसेसचे नियोजन

Categories
Breaking News social पुणे

गणेशोत्सव कालावधीत पीएमपीएमएल कडून ६५४ जादा बसेसचे नियोजन

गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई/सजावट
पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या कारणास्तव प्रवासी नागरीकांचे सोयीकरीता प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही पुणे महानगर परीवहन महामंडळाकडून दि. ३१/०८/२०२२ ते दि. ०९/०९/२०२२ या कालावधीत पहिल्या टप्प्यामध्ये दि. ०१/०९/२०२२ ते दि. ०२/०९/२०२२ व दि. ०८/०९/२०२२ रोजी १६८ बसेस जादा म्हणुन व दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवाशी गरजे नुसार दि. ०३/०९/२०२२ ते ०७/०९/२०२२ व दि. ०९/०९/२०२२ या काळात गणेशोत्सवाकरीता जादा ६५४ बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

नागरिकांचे वाहतुकीचे सोयीसाठी खाली नमूद केलेल्या स्थानकावर प्रवासी गर्दीनुसार या कालावधीत खास
बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीमध्ये रात्री १० वा. नंतर बंद राहणार असून रात्री १० वा. नंतर सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहणार आहेत.

 रात्रौ १०.०० नंतर बससेवेसाठी प्रचलित दरामध्ये रूपये ५/- जादा दर आकारणी करण्यात येईल.

 गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्रौ बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांस रात्रौ
१२.०० वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत.

 श्री गणेशोत्सव कालावधीत शहर विभागातील रस्ते सायंकाळी पोलीस खात्याकडून बंद ठेवले जातात त्यामुळे शहराच्या आतील भागातील बससेवा पर्यायी मार्गाने चालु ठेवण्यात येईल.

गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांच्या सोयीसाठी वरील प्रमाणे जादा बस संचलन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवसभराच्या संचलनामध्ये नेहमीच्या शिवाजीरोड, बाजीरावरोड, लक्ष्मीरोड, टिळकरोड या रस्त्यांवरून संचलनात असलेल्या बसेसच्या मार्गामध्ये आवश्यकते नुसार बदल करण्यात येणार आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.