Vijaystambh | Perne Fata | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज | जिल्हाधिकाऱ्यांकडून परिसरातील सुविधांचा आढावा

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Vijaystambh | Perne Fata | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज | जिल्हाधिकाऱ्यांकडून परिसरातील सुविधांचा आढावा

Vijaystambh | Perne Fata | पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh IAS) यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतला. (Koregaon Bheema Vijaystambh)

यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बार्टीचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण,निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी शिक्रापूर येथील वाहनतळ आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशा सुविधा राहील याची दक्षता घ्यावी. नागरिकांना माहिती देण्यासाठी सूचना फलक ठिकठिकाणी लावावेत. गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी पीएमपीएमल बसेसच्या फेऱ्या सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिल्या.

*सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज*
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेवून अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. २९ ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे. २० फिरते दूचाकी आरोग्य पथक, ५० रुग्णवाहिका ९० तज्ज्ञ डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. खाजगी रुग्णालयात १०० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पुरेशा प्रमाणात औषधसाठादेखील ठेवण्यात आला आहे.

स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता दीडशे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या माता-भगिनींची काळजी घेण्यात आली असून एकूण पाच हिरकणी कक्ष उभारण्यात येत आहेत. हिरकणी कक्षामध्ये स्तनदा माता व ज्येष्ठ महिला यांना तसेच त्यांच्या समवेत असलेले लहान बालकांसाठी विश्रांती तसेच बालकांच्या मनोरंजनाकरीता खेळणी साहित्य व खाऊ ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

परिसरातील विविध ठिकाणी एकूण २ हजार २०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. वापराच्या पाण्यासाठी ४० टँकर आणि स्वच्छतेसाठी ४० सक्शनमशीन व १५ जेटींग मशीन ठेवण्यात आले आहेत. रस्त्यावर कचरा साचू नये याकरीता ५०० कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी २०० सफाई कामागार नियुक्त करण्यात आले आहेत. कचरा उचलण्याकरिता ८० घंटागाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना सुचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकांची व्यवस्था ( पब्लीक ॲड्रेस सिस्टिीम) करण्यात आली आहे. सीसीटीव्हीद्वारे परिसरावर नजर राहणार असून त्यासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

*पोलीस आयुक्तांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा*

पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी करुन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अरविंद चावरिया आदी उपस्थित होते.

*ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांच्या संकल्पनेतून विजयस्तंभ परिसरात बार्टी संस्थेच्यावतीने पुस्तकांचे ३०० स्टॉल उभारले आहेत. बार्टी संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके ८५ टक्के सवलतीच्या दरात अनुयायांना वितरण करण्यात येणार आहेत.
‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी, भारताचे संविधान, संविधान उद्देशिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बुद्ध आणि त्याचा धम्म आदी पुस्तके उपलब्ध असून अनुयायांनी बार्टीच्या दालनाला भेट देऊन या पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी केले आहे.

*सोहळ्याचे थेट प्रक्षेपण*

सोहळ्यास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांना घरबसल्या सोहळा पाहता यावा यासाठी सह्याद्री वाहिनीवरून १ जानेवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सकाळी ६.३० वाजता मान्यवर पाहुणे विजयस्तंभास अभिवादन करतील. ७.३० वाजता समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना दिली जाईल. सकाळी ९.३० वाजता ‘डॉ.बी.आर. आंबेडकर विज्डम बुकफेअर’चे उद्घाटन होईल, अशी माहिती बार्टीच्यावतीने देण्यात आली आहे.

Perne Phata | Vijaysthambh | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज |जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Perne Phata | Vijaysthambh | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज |जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 

Perne Phata | Vijaystambh | पेरणे फाटा (Perne Phata) येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा (Vijaysthambh salutation) शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी करण्यात आली असून सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh IAS) यांनी केले. (Koregaon Bheema Vijaystambh)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे, पीएमपीएलचे महाव्यवस्थापक संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, विविध यंत्रणांचे अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, दरवर्षी साजरा होणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा हा महत्वाचा आणि भावनीक कार्यक्रम आहे. यावर्षी अधिक अनुयायी येण्याचे गृहीत धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून शासनातर्फे समिती गठीत केली आहे. २१० एकरात ३३ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था, पीएमपीएल बसेससाठी ४ ठिकाणी थांब्याची सोय, राखीव वाहनतळ, वीज, आकर्षक रोषणाई, बुक स्टॉल, शुद्ध पाण्याची व्यवस्थेसाठी १५० टँकर्स, फिरते शौचालय, आरोग्य सेवेसाठी १५ पथके, २५९ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, ५० रुग्णवाहिका, २७ जनरेटर सेट, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकासोबत स्वयंसेवक बोटी इत्यादी आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ४ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी ४७५ पीएमपीएल बसेस तर १ जानेवारी २०२४ रोजी ५७५ पीएमपीएल बसेसचे नियोजन केले आहे. प्रत्येक बसवर दोन कर्मचारी, राखीव चालक, यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे पोलीस विभागाकडून पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. वाहतूकीतील बदलांविषयी नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येईल.

सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील. आयोजनादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आनंदाच्या वातावरणात सोहळा साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. सोहळा शांतता, संयम आणि त्याच उंचीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले.

विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सूचना केल्या आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

Vijaysthambh Abhiwadan Koregaon Bheema | विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी |अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Vijaysthambh Abhiwadan Koregaon Bheema | विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

|अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

 

Vijaysthambh Abhiwadan Koregaon Bheema |पुणे| जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh IAS) यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन (Vijaysthambh Abhiwadan Perne Fata) कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; यावेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Koregaon Bheema Perne Fata)

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह वाहनतळाची जागा आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, स्नेहा किसवे-देवकाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित होते. (Vijaysthambh Abhiwadan)

डॉ. देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) विजयस्तंभ परिसरात आयोजित आढावा बैठकीत करण्यात येत असलेल्या कामांबाबत आढावा घेतला. १ जानेवारी रोजी  विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायांना सर्व सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन याबाबत केलेल्या पूर्वतायरीची माहिती त्यांनी घेतली.

दरवर्षी अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय करावी. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या नियोजनाबाबत सूक्ष्म नियोजन करावे. वाहतुकीचे नियोजन करून त्याची नागरिकांना माहिती द्यावी , अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीदेखील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला व नियोजनसंबंधी सूचना दिल्या

यावेळी संबधीत अधिकाऱ्यांनी करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली.

| पुणे महापालिकेकडे पाणी पुरवठ्याची जबाबदारी 

दरम्यान सोहळ्यासाठी राज्यभरातून लोक येणार आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणे महत्वाचे आहे. याची मागणी पुणे जिल्हा परिषदने पुणे  महापालिकेकडे केली आहे. पुणे महापालिकेला ७० ते ७५ पाण्याचे tanker ३१ डिसेंबर लाच उपलब्ध करून देण्यासा सांगण्यात आले आहे.

Koregaon-Bhima | पीएमपीएमएल कडून कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पीएमपीएमएल कडून कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दि. १ जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. कोरेगांव-भिमा येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातून तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी तसेच येणारी वाढीव प्रवासी संख्या विचारात घेवून परिवहन महामंडळाच्या वतीने ३१ डिसेंबर  व १ जानेवारी रोजी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ०९.०० ते १ जानेवारी रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत तुळापूर फाटा,
लोणीकंद कुस्ती मैदान येथून ४० बसेस, वढू फाटा (इनामदार हॉस्पिटल) ते वढू करिता ५ बसेस व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते भिमा कोरेगांव पर्यंत ३५ बसेस अशा एकूण ८० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दि. ०१/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, फुलगाव शाळा ते पेरणे टोल नाका पर्यंत १४० बसेस व शिक्रापूर रोड (तोरणा हॉटेल) ते भिमा कोरेगांव पर्यंत ११५ बसेस आणि वढू फाटा ते वढू पर्यंत २५ बसेस अशा एकूण २८० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध स्थानकांवरून प्रवास भाडे आकारणी करून जादा बसेसचे नियोजन देखील करण्यात आले आहे.