Bhima Koregoan | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Bhima Koregoan | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग

Bhima Koregoan | Vijaystambh | 1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त (Shourya divas)  राज्यासह देशभरातून सुमारे 15 लाख पेक्षा अधिक भीम अनुयायी भीमा कोरेगाव (Bhima Koregoan) येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी रोजी विजयस्तंभ परिसरामधे स्वच्छता रहावी व स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेतला. या वेळी परिसरातील कचरा, पाण्याच्या बॉटल, कागद आदी उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.

या स्वच्छता उपक्रमात क्टेलिस्ट फाउंडेशनचे सुनिल माने व सहकारी, बीबीसीचे सहकारी, भीम युवा संघ, महिला संघटना, विजय कांबळे, संदिप चाबुकस्वार, भंते नागघोष सर्व भीम सहकारी यांनी पुणे मनपा आरोग्य विभाग, स्वच्छ संस्था, आधार पुनावाला समुह, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पेरणे ग्राम पंचायत आदींच्या सोबत परिसर स्वच्छ करून घेतला.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, भीमा कोरेगावला ऐतिहासिक वारसा आहे. त्यांच्या आठवणींचे जतन भीम अनुयायी करत असतात. ही ऐतिहासिक आठवण स्मरणात रहावी, यासाठी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. त्याला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. एवढ्या प्रचंड संख्येनंतर या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी देखील आपलीच आहे, या सामाजिक भावनेतून परिसरात स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. गेल्या 10 वर्षांपासून स्वच्छतेच्या उपक्रमासाठी पुढाकार घेत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. त्याला यश फाउंडेशन, क्रिस्टल संस्था, आयुष आंबेडकरी युवा संघ, स्वच्छ संस्था, आधार पुनावाला संस्था, पेरणे ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी या सामाजिक संघटनांची देखील मोलाची साथ मिळत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
—————————-

Vijaysthambh Abhiwadan Koregaon Bheema | विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी |अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Vijaysthambh Abhiwadan Koregaon Bheema | विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

|अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

 

Vijaysthambh Abhiwadan Koregaon Bheema |पुणे| जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh IAS) यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन (Vijaysthambh Abhiwadan Perne Fata) कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; यावेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Koregaon Bheema Perne Fata)

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह वाहनतळाची जागा आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, स्नेहा किसवे-देवकाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित होते. (Vijaysthambh Abhiwadan)

डॉ. देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) विजयस्तंभ परिसरात आयोजित आढावा बैठकीत करण्यात येत असलेल्या कामांबाबत आढावा घेतला. १ जानेवारी रोजी  विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायांना सर्व सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन याबाबत केलेल्या पूर्वतायरीची माहिती त्यांनी घेतली.

दरवर्षी अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय करावी. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या नियोजनाबाबत सूक्ष्म नियोजन करावे. वाहतुकीचे नियोजन करून त्याची नागरिकांना माहिती द्यावी , अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीदेखील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला व नियोजनसंबंधी सूचना दिल्या

यावेळी संबधीत अधिकाऱ्यांनी करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली.

| पुणे महापालिकेकडे पाणी पुरवठ्याची जबाबदारी 

दरम्यान सोहळ्यासाठी राज्यभरातून लोक येणार आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणे महत्वाचे आहे. याची मागणी पुणे जिल्हा परिषदने पुणे  महापालिकेकडे केली आहे. पुणे महापालिकेला ७० ते ७५ पाण्याचे tanker ३१ डिसेंबर लाच उपलब्ध करून देण्यासा सांगण्यात आले आहे.