Pune Potholes | 24×7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप | खड्डे बुजणार कधी आणि कसे हे स्पष्ट करावे | संदीप खर्डेकर यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

Pune Potholes | 24×7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप |  खड्डे बुजणार कधी आणि कसे हे स्पष्ट करावे | संदीप खर्डेकर यांची मागणी

Pune Potholes | 24×7, पुणे मेट्रो यासह विविध विकासकामांसाठी केलेल्या खोदाई नंतर पुण्यातील अनेक रस्त्यांची शब्दश: चाळण झाली असून ह्या रस्त्यांवरून जाताना नागरिकांची हाडं आणि वाहने सुद्धा खिळाखिळी झाली आहेत. विशेष म्हणजे सर्व स्तरावर तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे च आहे.  24×7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप असा आरोप करत खड्डे बुजणार कधी आणि कसे हे स्पष्ट करावे, अशी मागणी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर (BJP Spokesperson Sandeep Khardekar) यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्याकडे केली आहे. (Pune Potholes)
खर्डेकर यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार त्वरित खड्डे बुजविण्याचे आदेश देतानाच खड्डे ना बुजविल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा ही इशारा आपण दिला आहे. वानगी दाखल फक्त कर्वेनगर व एरंडवण्यातील काही उदाहरण देत आहे. अलंकार पोलीस स्टेशन जवळील शैलेश पूल, पुढे समर्थ पथावरील शक्ती 98 चौक, गिरीजाशंकर विहार कडे जाणारा रस्ता, k52 समोरील तसेच सहवास सोसायटी कडे जाणारा रस्ता, नळस्टॉप चौकातील गल्लीत टेलिफोन एक्सचेंज मागील रस्ता अश्या अनेक ठिकाणी रस्ते खचले असून चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यावरून दुचाकी घसरून पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तर अनेकांना पावसाचे पाणी साचल्यावर खड्ड्याचा अंदाज ना आल्याने गाडी उडून कंबर, मान आणि मणकेला मार बसला आहे. 24×7 पाणीपुरवठा योजना शहरासाठी महत्वाची असली तरी सदर काम करणाऱ्या कंपनी कडून रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्यावी. यामुळे 24×7 म्हणजे पुणेकरांसाठी विकतचे दुखणे झाले आहे.मनपा च्या पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन, महावितरण च्या विद्युत लाईन, खासगी कंपन्याची केबल साठीची खोदाई ह्या सगळ्या कामानंतर रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत आणि त्याचा मोठा फटका पुणेकरांना बसत आहे. खड्डे बुजविताना डांबर योग्य तपमानाचे नसल्याने लगेचच खडी रस्त्यावर पसरते आणि खड्डा परवडला पण अशास्त्रीय पद्धतीने बुजविणे नको असे सर्वांचेच मत झाले आहे.तरी आपण युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून पुणेकरांना दिलासा द्यावा. अजून पुण्यात मोठा पाऊस झालेला नाही. त्यानंतर काय स्थिती होईल याची कल्पनाच करवत नाही. आपण योग्य कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे. असे खर्डेकर यांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
—-
News Title | Pune Potholes | Excavation of 24×7 water supply scheme means pain for Pune residents Explain when and how the potholes will be filled Demand of Sandeep Khardekar