PMC CHS Card | CHS योजनेतील नवीन बदल जाणून घ्या! | काय आहे नवीन परिपत्रकात?

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

PMC CHS Card | CHS योजनेतील नवीन बदल जाणून घ्या! | काय आहे नवीन परिपत्रकात?

PMC CHS Card | पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत (PMC Health Department) अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना (CHS) कार्यान्वित आहे. या  अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल विभागाकडील सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका, मा. आजी सभासद, व मा. माजी सभासद यांचे वैयक्तिक स्वखार्चाची वैद्यकीय परतावा बिले सादर केल्यानंतर वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. दरम्यान आता एका CHS कार्डवर (CHS Card) आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाच लाभ घेता येणार आहे. एकाचवेळी चौघांना लाभ न देण्याचा निर्णय CHS कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान याबाबत प्रशासनाकडून दोन परिपत्रके काढण्यात आली आहेत. नवीन परिपत्रकात महिला कर्मचारी तसेच महिला आजी माजी सभासद, महिला सेविका यांच्याबाबत नियम करण्यात आला आहे.  (PMC Pune Health Department)

पूर्वीच्या परिपत्रकात काय होते?

 पुणे मनपा सेवक, सेवा निवृत्त सेवक/सेविका, शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल  सेवक/सेविका विभागाकडील सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका, मा. आजी सभासद, व मा. माजी सभासद यांना
त्यांच्या फक्त आई-वडिलांची नांवे अथवा फुक्त सासू-सासरे यांची नावे नियमानुसार समाविष्ठ करता येतील.
ज्या वर्षी आई-वडील किंवा सासू सासरे यांचे नांव समाविष्ठ असेल त्या आर्थिक वर्षासाठी आई-वडील किंवा सासू सासरे यांचीच नांवे समाविष्ठ राहतील. आई-वडील अथवा सासू सासरे यापैकी जी नांवे कार्डवर समाविष्ठ करावयाची असतील, ती नांवे तसे स्वयंघोषणापत्र भरुन दिल्यानंतर त्या पुढील आर्थिक वर्षातच समाविष्ठ करता येतील. परंतू एकदा निश्चीत केलेली नावे अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना कार्डमध्ये नियमानुसार समाविष्ठ केल्यास त्यामध्ये चालू आर्थिक वर्षात बदल करता येणार नाही. (Pune Municipal Corporation)

नवीन परिपत्रकात काय आहे?

पुणे महानगरपालिकेच्या सेविका, सेवा निवृत्त सेविका शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल विभागाकडील सेविका, सेवा निवृत्त सेविका, मा. आजी नगरसेविका व मा. माजी नगरसेविका यांना मुलभूतरीत्या फक्त त्यांच्या आई-वडिलांची नांवे नियमानुसार अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या कार्डमध्ये समाविष्ठ करता येतील. तसेच सासू-सासरे यांची नावे जर समाविष्ट करावयची असतील तर त्याआर्थिक वर्षात आई-वडिलांची नावे योजनेच्या कार्डमध्ये टाकणार नाही या आशयाचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षात आई-वडील किंवा सासू-सासरे अश्या एकाच जोडीचे नाव योजना कार्डमध्ये टाकता येईल. (PMC Pune News)
—-