PMC Dialysis Center | पुणे महापालिकेने शुल्क वेळेत न दिल्याने डायलिसिस सेवेवर परिणाम | लायन्स क्लबचे स्पष्टीकरण

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

PMC Dialysis Center | पुणे महापालिकेने शुल्क वेळेत न दिल्याने डायलिसिस सेवेवर परिणाम | लायन्स क्लबचे स्पष्टीकरण

| केंद्र बंद करण्याची अथवा करार रद्द करण्याची आवश्यकता नाही :

PMC Dialysis Center |  पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) शुल्क वेळेत येत नसल्यानेच   डायलिसिस सेवेवर (Dialysis Service) परिणाम होत असून कमला नेहरू रुग्णालयातील (PMC Kamla Nehru Hospital) डायलिसिस सेवा केंद्र   बंद करण्याची आवश्यकता नाही, असे  स्पष्टीकरण लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टने (Lions Club of Pune Mukundnagar Charitable Trust) दिले आहे. (PMC Dialysis Center)
लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष  रामदास पन्हाळे यांनी आज पत्रकाद्वारे संस्थेची बाजू मांडली आहे.
   ५, ६ महिन्यांची देयके प्रलंबित राहत होती.क्लबने शुल्कांच्या देयकांबाबत वारंवार आरोग्य विभागाशी संपर्क साधलेला आहे. तरीही दखल घेतली जात नव्हती. थकीत बिले आल्याबरोबर योग्य ती पावले उचलून सेंटर पूर्ववत करण्यात आले आहे व तसे महानगरपालिकेला कळविण्यात आले आहे.  सेवा पूर्ववत झाल्याने रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच महानगर पालिकेनेही या योजनेअंतर्गत येणारे रुग्ण पाठवावे अशी विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे. (PMC Pune Health Department)
२०१६ पासून हे केंद्र पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत पालिकेसमवेत स्वयंसेवी संस्था या नात्याने चालवले जाते. शहरी गरीब योजनेअंतर्गत रुग्ण येथे डायलिसिस सेवा घ्यायला येतात. त्याचे शुल्काची देयके पालिका नंतर लायन्स क्लबला देते. रुग्णांकडून हे केंद्र पैसे घेत नाही. त्यामुळे पालिकेकडून येणारे पैसे लांबले की सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वाढते. (Pune Municipal Corporation News)
जी मशिन्स काही तांत्रिक कारणाने बंद होती ती सुद्धा चालु केलेली आहे. आताही ६ मशिन्स चालु असून दरमहा ४५० पेक्षा जास्त डायलिसिस सेशन करण्याची केंद्राची क्षमता आहे. पुढील १५ दिवसात उर्वरित मशिन्स चालू होऊन ही क्षमता ८५० पेक्षा जास्त होत आहे.   मात्र, कोविड पश्चात दरमहा ३५० देखील डायलिसिस सेशन होत नाहीत. त्यामुळे सर्व डायलिसिस यंत्रे वापरली जात नाहीत. तशी आवश्यकता भासत नाही. (PMC Health Department)
या प्रकल्पातील डायलिसिस यंत्रे व संबंधित यंत्रणा लायन्स क्लबने उभी केली आहे.
 कमला नेहरू रुणालयातील डायलिसिस सेंटर बंद ठेवल्याप्रकरणी लायन्स क्लबला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या सेंटरमधील १२ डायलिसिस मशिनपैकी १० बंद आहेत. केवळ दोन मशीन सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे, असे पालिकेने बजावलेल्या नोटीशीत म्हटले होते. (Kamla Nehru Hospital Pune)
गेल्या चार-पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेले पेमेंट फक्त दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आले आहे. आमचा करार रद्द करण्याची गरज नाही. कारण, थकीत बिले आल्याबरोबर योग्य ती पावले उचलून सेंटर पूर्ववत करण्यात आले आहे व तसे महानगरपालिकेला कळविण्यात आले आहे.
सेवा पूर्ववत झाल्याने रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच महानगर पालिकेनेही या योजनेअंतर्गत येणारे रुग्ण पाठवावे अशी विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
या सेंटर मधील तीन मशीन वगळता सर्व पायाभूत सुविधा पूर्णपणे लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीच्या आहेत,’ असे लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पन्हाळे यांनी म्हटले आहे.
News Title | PMC Dialysis Center | Due to non-payment of fee by Pune Municipal Corporation in time, impact on dialysis service Explanation of the Lions Club