PMC Maternity Homes | पुणे महापालिकेकडून प्रसूत मातांसाठी डायट प्लॅन (Diet plan)

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

PMC Maternity Homes | पुणे महापालिकेकडून प्रसूत मातांसाठी डायट प्लॅन (Diet plan)

| महापालिकेच्या 8 प्रमुख दवाखाने व प्रसूती गृहामध्ये सुविधा

PMC Maternity Homes | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शहरात केंद्र सरकारचा जननी शिशु सुरक्षा (JSSK) कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत प्रसूत झालेल्या मातांसाठी महापालिकेच्या वतीने मोफत डायट प्लान (Diet Plan for New Mothers) सुरु केला आहे. त्याचबरोबर ड्रॉप बॅक (Drop Back) अर्थात मातांना ऍम्ब्युलन्स मधून त्यांच्या घरी नेऊन देखील सोडले जात आहे. नुकतीच याची सुरुवात महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव (Dr Vaishali Jadhav PMC) यांनी दिली. (PMC Diet Plan for New Mothers)
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचे चार प्रमुख घटक आहेत. यामध्ये मोफत आहार, महिलांना घरी नेऊन सोडणे, औषधे आणि त्यांच्या विविध तपासण्या करणे, यांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने फक्त औषधे आणि तपासण्या केल्या जात होत्या. मात्र आता आहार आणि घरी सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सहायक आरोग्य अधिकारी डॉ जाधव यांनी यात पुढाकार घेऊन या दोन गोष्टी सुरु केल्या आहेत. गेल्या महिन्या भरपासून महिलांना घरी सोडण्यात येत आहे. तर डाएट प्लॅन ची वर्क ऑर्डर देखील देण्यात आली आहे.
डॉ जाधव यांच्या माहितीनुसार महापालिकेच्या प्रमुख 8 दवाखाने आणि प्रसूती गृहामध्ये डायट प्लान सुरु करण्यात आला आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी वर्षभरासाठी 1 कोटी 11 लाखांचा खर्च होणार आहे. यामध्ये मातांना दोन वेळा चहा, एक वेळ नाष्टा आणि दोन वेळा जेवण देण्यात येणार आहे. संबंधित मातेची प्रसूती ही नॉर्मल असेल तर तिला तीन दिवस आहार दिला जाणार आहे आणि सीझर झाले असेल तर 7 दिवस आहार दिला जाणार आहे. दरम्यान महापालिकेच्या सर्वच प्रसूती गृहामध्ये ही सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे.
: या दवाखाने व प्रसूती गृहामध्ये सुरु आहे डायट प्लान (PMC Hospitals and Maternity Homes) 
1. कमला नेहरू रुग्णालय
2. कै मातोश्री रमाबाई आंबडेकर प्रसूतिगृह
3. डॉ दळवी रुग्णालय
4. कै चंदूमामा सोनावणे प्रसूतिगृह
5. भारतरत्न स्व राजीव गांधी रुग्णालय
6. कै सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह
7. कै मालती काची प्रसूतिगृह
8. राजमाता जिजाऊ प्रसूतिगृह