President Election | राष्ट्रपती निवडणूक : विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा उमेदवार 

Categories
Breaking News Political देश/विदेश
Spread the love

राष्ट्रपती निवडणूक : विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा उमेदवार 

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार असून, यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. या दरम्यान, आज विरोधी पक्षांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली आहे.

या बैठकीला जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, शरद पवार, डी राजा, तिरुची शिवा (डीएमके), प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी), मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फरन्स) यांच्यासह अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव हेही या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय या बैठकीला ओवैसी यांच्या पक्षाचे खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. गेल्या बैठकीत AIMIM ला बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहिलो नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी यशवंत सिन्हा यांनी सकाळी ट्वीट करत ‘तृणमूल काँग्रेसमध्ये मला सन्मान आणि प्रतिष्ठा दिल्याबद्दल ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे आभार मानले होते. आता माझ्यावर पक्षापासून फारकत घेऊन मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी, विरोधी ऐक्यासाठी काम करण्याची वेळ आलीय. मला खात्री आहे की, ममता बॅनर्जी माझं हे धोरण स्वीकारतील अशा आशयाचं ट्वीट सिन्हा यांनी केले आहे.