Pune Bulk Waste Generators | बंद असणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटर्सवर होणार आता जोरदार दंडात्मक कारवाई!  | सर्व क्षेत्रीय कार्यालयांना घनकचरा विभागाच्या उपायुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Pune Bulk Waste Generators | बंद असणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटर्सवर होणार आता जोरदार दंडात्मक कारवाई!

| सर्व क्षेत्रीय कार्यालयांना घनकचरा विभागाच्या उपायुक्तांचे आदेश

Pune Bill Waste Generators | पुणे शहरात दर दिवशी 100 किलो कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटी तसेच सर्व आस्थापनाना त्यांच्या आवारात ओला कचरा (Wet waste disposal) जिरवणे बंधनकारक आहे. त्यासाठी बायोगॅस (Biogas Project) किंवा गांडूळ खत प्रकल्प (Composting) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा आस्थापनाना पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) मिळकत करात सूट (Pune Property tax Discount) देखील देते. मात्र सूट घेऊन काही प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे अशा बंद असणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटर्सवर आता जोरदार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सर्व सहायक आयुक्तांना (PMC Ward officers) याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम (Sandip Kadam PMC) यांनी सक्त आदेश दिले आहेत. (Pune Bill Waste Generators)

: कंपोस्टिंग, बायोमिथनायझेशन बंधनकारक 

नागरी घनकचरा ( व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०१६ अन्वये प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण करणा-या कोणत्याही आस्थापना, (गृहसंस्था, बंगले, रुग्णालये, नर्सिंग होम, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, इतर शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, हॉटेल्स, मंगल कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, बाजारपेठ, केंद्र सरकारच्या विभागांनी व्यापलेल्या इमारती किंवा उपक्रम, राज्य सरकारी विभाग किंवा उपक्रम, स्थानिक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा खाजगी कंपन्या, धार्मिक स्थळे, स्टेडीयम आणि क्रीडा संकुल) इत्यादी यांनी त्यांच्या आस्थापनेत निर्माण होणा-या (ओला कचरा) जैव विघटनशील कच-याची विल्हेवाट त्यांच्याच आवारात कंपोस्टिंग, बायोमिथनायझेशन अथवा अन्य तंत्रज्ञानाद्वारे लावणे बंधनकारक आहे.
: कारवाई होत नसल्याचे उघड 
कदम यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका, प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण करणा-या सोसायट्या, BWG हॉस्पिटल्स, हॉटेल्स, कॉलेजेस व आय. टी. कंपनी इत्यादी बल्क वेस्ट जनरेटर्सची सविस्तर यादी सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या  कार्यक्षेत्रात येणा-या बल्क वेस्ट जनरेटर्सच्या ठिकाणी ओला कचरा जिरविण्याची यंत्रणा उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत माहिती संकलित करण्याबाबत वेळोवेळी आदेशित करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी प्रकल्प कार्यान्वित नसेल त्या आस्थापनांना नियमाप्रमाणे नोटीस देऊन व आवश्यक त्याठिकाणी दंडात्मक कारवाई करून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व BWG च्या परिसरात ओला कचरा जिरविण्याची यंत्रणा कार्यान्वित करणेबाबत वेळोवेळी आपणास कळविण्यात आलेले आहे. तथापि आपल्या कार्यक्षेत्रातील ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद असणा-या बल्क वेस्ट जनरेटर्सवर प्रभावी दंडात्मक कारवाई होत नसल्याचे दैनंदिन अहवालावरून दिसून येत आहे.
: ओल्या कचऱ्याचा भार महापालिकेवर 
त्याचप्रमाणे या आस्थापनांचा ओला कचरा प्रक्रिया करण्याचा अनावश्यक अतिरिक्त भार पुणे महानगरपालिकेच्या यंत्रणेवर येत आहे. याबाबत हेतुपुरस्सर गैरव्यवहार होत असल्याच्या वारंवार तक्रारी देखील येत आहे.त्यानुसार  कार्यक्षेत्रातील सर्व BWG ची प्रत्यक्ष पहाणी करून त्याठिकाणी ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु नसल्यास नियमांचे अनुपालन न करणा-या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
: 7 दिवसांची मुदत 
पुढील ७ दिवसांच्या आत आपल्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व बल्क वेस्ट जनरेटर्सची पाहणी संबंधित आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांचे मार्फत करण्यात यावी. बल्क वेस्ट जनरेटर्स मार्फत निर्माण होणाऱ्या जैव विघटनशील कच-याची विल्हेवाट त्यांचेच आवारात कंपोस्टिंग, बायोमिथनायझेशन अथवा अन्य तंत्रज्ञानाद्वारे लावणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. बंद असलेले बल्क वेस्ट जनरेटर्स पूर्ण क्षमतेने सुरु राहतील याची जबाबदारी आपली व संबंधित वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांची राहील. सबंधित बल्क वेस्ट जनरेटर्सचा ओला कचरा महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत उचलला जाणार नाही याची खातरजमा आपल्या स्तरावर करण्यात यावी. असे कदम यांनी आदेशात म्हटले आहे.