PMC Pune Water Supply Department | … नाहीतर बिल्डरवर आणि ठेकेदारावर होणार कारवाई | पुणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Pune Water Supply Department | … नाहीतर बिल्डरवर आणि ठेकेदारावर होणार कारवाई | पुणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय

| पुणे शहरातील बांधकामासाठी STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकार

PMC Pune Water Supply Department | पुणे शहरात (Pune city) चालणाऱ्या विविध बांधकामांसाठी (Construction) यापुढे पिण्याचे पाणी तसेच बोअरवेल, विहिरींचे पाणी न वापरता फक्त STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या विकसकांमार्फत (Builder) सदरचे पाणी वापरले जाणार नाही, त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) विविध खात्यामध्ये (PMC Departments) चालू असलेल्या कॉक्रिटीकरणाचे कामाकरीता देखील संबंधित ठेकेदारांनी (contractor) STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून (PMC water supply department) हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. (PMC Pune water supply department) 

विकसकांकडून (Builder) पुणे शहरात (Pune city) विविध ठिकाणी चालणाऱ्या बांधकामांमध्ये पुणे महानगरपालिकेचे (PMC Pune) सिवेज ट्रिटमेंन्ट प्लॅन्टस् (Sewage Treatment plant) मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) बंधनकारक केलेले आहे. या विकसकांना STP मधून प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने pmcstpwatertanker हे App विकसित केले असून, , हे सध्या Android Phone साठी विकसित करण्यात आलेले आहे. सदर App मध्ये विकसकांनी त्यांचे बांधकामाचे साईटनिहाय रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. STP चे प्रक्रिया केलेले पाणी पुरविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या टँकर मालकांनी सदर App वर रजिस्ट्रेशन केलेले असून, ज्या साईटवर विकसकांना STP मधून प्रक्रिया केलेले पाणी आवश्यक आहे त्यानुसार सदर App चे माध्यमातून त्यांनी त्यांची मागणी नोंदवावयाची असून, उपलब्ध टँकर मालकांचे यादी मधील टँकरधारक नोंदवायचे असून, App मध्ये नमूद केलेले शुल्क सदर टँकरधारकाला टँकर साईटवर पोहचविण्याचे अनुषंगाने आदा करावयाचे आहे.

App चे उद्घाटन आज महापालिका आयुक्त यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी  अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), रविंद्र बिनवडे तसेच विदयुत विभागाचे मुख्य अभियंता  श्रीनिवास कंदुल व पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुध्द पावसकर उपस्थित होते.

——-

News Title | PMC Pune Water Supply Department | … otherwise action will be taken against the builder and the contractor Important decision of Pune Municipal Corporation