Zika Virus in Pune | झिकाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करा | मुरलीधर मोहोळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे
Spread the love

Zika Virus in Pune | झिकाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करा | मुरलीधर मोहोळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

 

Zika virus in Pune | झिकाचा(Zika virus) प्रसार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्याची मागणी माजी महापौर मुरलीधर मोहोळ (former Mayor Murlidhar Mohol) यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)

मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिका हद्दीत झिका विषाणूचे रुग्ण आढळत असल्याचे स्पष्ट झाले असून झिका व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, त्यावर उपाययोजनांची दिशा ठरवण्यासाठी एका विशेष टास्क फोर्सची निर्मिती करणे आवश्यक आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूची पार्श्वभूमी पाहता, यावर योग्यवेळी आवर घालणे आणि नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.

येरवडा येथील प्रतीकनगर येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेला झिका विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे बाधित भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्स नियुक्त करावी. यासोबतच या संसर्गजन्य विषाणूसंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्या.  याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.