PMC WhatsApp ChatBot | Property Tax Bills | पुणे महापालिकेने WhatsApp Chatbot च्या माध्यमातून पाठवली 12 लाख मिळकतकर बिले

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC WhatsApp ChatBot | Property Tax Bills | पुणे महापालिकेने WhatsApp Chatbot च्या माध्यमातून पाठवली 12 लाख मिळकतकर बिले

| नागरिक आणि महापालिकेला देखील फायदा

PMC WhatsApp ChatBot | Property Tax Bills  | नागरिकांसाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) WhatsApp Chatbot प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीचा वापर करून महापालिकेने मिळकत कराची (Property Tax Bills) जवळपास 12 लाख बिले नागरिकाना पाठवली आहेत. यामुळे नागरिकांना देखील फायदा झाला असून महापालिकेची मिळकत कराची वसूली देखील होऊ लागली आहे. अशी माहिती प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC WhatsApp ChatBot | Property Tax Bills)
पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) नागरिकांच्या शंकांचे निराकरण, तक्रारी, नजीकच्या आरोग्य सेवांविषयी माहिती, विविध विभागाकडील नागरीकाभिमुख माहिती, जलदरित्या व सहजपणे नागरिकांना देणेकरीता ChatBot ची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच प्रणालीचा वापर करत प्रॉपर्टी टॅक्स विभागाने मिळकत कराची 12 लाख बिले पाठवली आहेत. यामध्ये 23 गावांचा समावेश नाही. Whatsapp वर ही बिले नागरिकांना मिळाली. तसेच त्यातच कर भरण्याबाबत देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना कर भरणा करणे सोयीचे झाले आहे. यामुळे महापालिकेचे उत्पन्न देखील वाढू लागले आहे. (PMC Pune News) 
दरम्यान शहरात ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत ०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येणार आहे.  वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना  ०१.०४.२०१८ पासून ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत दि. ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज संपूर्ण पुराव्यांसह दि. १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वःवापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. (Pune Municipal Corporation property tax)
—-
Whatsapp chatbot च्या माध्यमातून आम्ही 12 लाख बिले पाठवली आहेत. यामुळे नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स भरणे सोयीचे होणार आहे. नागरिकांना तात्काळ कर भरावा. तसेच महापालिकेच्या सवलतीचा लाभ घ्यावा. शिवाय मिळकत कर भरून महापालिकेची बक्षिसे देखील जिंकावीत. असे नागरिकांना आवाहन आहे.
अजित देशमुख, उपायुक्त्त, कर आकारणी व कर संकलन विभाग.
—-
Whatsapp chatbot चा नागरिकांना फायदा होत आहे. याचाच वापर करून कमी कालावधीत बिले पाठवण्यात आली आहेत. तसेच यामध्ये बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज 25-30 हजार नागरिक chatbot चा वापर करतात. तसेच काही शंका असल्यास कळवतात. यामुळे बिले भरण्याची संख्या देखील वाढली आहे.

राहुल  जगताप, संगणक विभाग प्रमुख 
News Title | PMC WhatsApp ChatBot |  Property Tax Bills |  Pune Municipal Corporation sent 12 lakh income tax bills through WhatsApp Chatbot