Congress| Pune| काँग्रेस तर्फे पोस्टमन काकांची भाऊबीज साजरी

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

काँग्रेस तर्फे पोस्टमन काकांची भाऊबीज साजरी

– करोना काळात घरो घरी जाऊन पत्र व पार्सल देण्याची सेवा देत पोस्टमन यांनी करोना योद्धा म्हणून भूमिका बजावली.प्रभाग  क्रमांक  २८ मधिल दर  वर्षी प्रमाणे  “पोस्टमन काका” यांना काँग्रेस महिलांकडून औक्षण  करून  “भाऊबीज” अनोख्या पद्धतीने  साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे  विजयकांत कोठारी,माजी महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी सरचिट्णीस अभय छाजेड,समाजसेवीका रिटा गांधी,शशीकांत सुराणा,सूजाता वाळूजं, यांच्या हस्ते पोस्टमन काका ना धान्य कीट देण्यात आली.

यावेळी अभय छाजेड म्हणाले की वर्षभर अनेक संकटान वर मात करत सरकारी टपाल खाते काम करत असते पोस्टमन हे प्रामाणिक पणे कर्तव्य पार पाडतात त्यामुळे नागरिकांना आपली कागदपत्रे सुरक्षित पणे घरपोच मिळतात आज तंत्रज्ञानाच्या युगातही पोस्टमन ची भूमिका महत्त्वाची आहे त्यामुळे कॉग्रेस पक्षा तर्फे भरत सुराणा यांनी घेतलेला उपक्रम स्तुत्य म्हणावा लागेल.

यावेळी पोस्टमन भावनिक होत आपल्या भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन  पुणे शहर  जिल्हा महिला काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस  योगिता  सुराणा  व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वाणिज्य  औद्योगिक सेल (व्यापारी सेल) अध्यक्ष भरत सुराणा यानी  केले होते

 

यावेळी बेबी राऊत,शर्मिला जैन, हलिमा शेख,हसीना शेख,तस्लीम शेख,अनीता,नाना हूले,अल्ताफ सौदागर,भारत काळे, काटकर काका,कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थितीत  होते

 

 

———-

कोरोना मधे पोलिसांचा, डॉक्टरांचा,सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला  परंतु घरोघरी जाऊन आपले महत्त्वाचे पत्र देण्याचे कर्तव्य आम्ही करत होतो  पोस्टमन म्हणून आम्ही केलेल्या कामाची दखल घेतली गेली. गेल्या अनेक वर्षा पासून  भरत सुराणा, व योगिता सुराणा  हा उपक्रम करून आम्हाला देत असलेल्या भाऊबीज  सन्माना मुळे आनंद होत आहे.

विनायक खेडेकर , पोस्टमन

 

 

————-