Pune Metro | Pune Airport New Terminal | रूबी हॉल ते रामवाडी मेट्रो आणि नवीन विमानतळ टर्मिनलचे उदघाटनासाठी घंटानाद आंदोलन!

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

Pune Metro | Pune Airport New Terminal | रूबी हॉल ते रामवाडी मेट्रो आणि नवीन विमानतळ टर्मिनलचे उदघाटनासाठी घंटानाद आंदोलन!

|सार्वजनिक काकांनी दाखविलेल्या सनदशीर मार्गाने सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन : मोहन जोशी

 

The karbhari | पुणे – रूबी हॉल ते रामवाडी मेट्रो (Ruby Hall to Ramwadi Metro) आणि लोहगाव विमानतळाचे नवीन टर्मिनल (Pune Airport New Terminal), या प्रकल्पांचे लवकरात लवकर उदघाटन करा, या मागणीसाठी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक काका (Sarvajanik Kaka) यांच्या पुतळ्यासमोर आज (शुक्रवारी) दुपारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

इंग्रज सरकारच्या विरोधात सनदशीर मार्गाने होणाऱ्या चळवळीचा पाया कै.गणेश वासूदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी रचला. त्यांच्या सनदशीर आंदोलनाचे अनुकरण करीत बाजीराव रस्त्यावरील सार्वजनिक काकांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाने घंटानाद आंदोलन केले. सद्यस्थितीत मोदी सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

रूबी हॉल ते रामवाडी मेट्रो आणि लोहगाव विमानतळाचे टर्मिनल हे दोन प्रकल्प पुणेकरांच्या सोयीसाठी लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे आहे. जनतेच्या कोट्यवधी रुपयांतून हे प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. हे प्रकल्प पूर्णपणे तयार आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकल्पांच्या उदघाटनासाठी सोयीची वेळ मिळावी म्हणून उदघाटन लांबवले जात आहे. दि. १९ फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळ टर्मिनलचे उदघाटन होणार म्हणून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तयारीसाठी अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. प्रत्यक्षात उदघाटन झालेच नाही, हा संतापजनक प्रकार आहे. सरकारला जागे करण्यासाठीच सार्वजनिक काकांच्या पुतळ्याच्या साक्षीने काँग्रेस पक्षाने घंटानाद आंदोलन केले आहे. या मागण्यांसाठी यापुढेही सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला.

या आंदोलनात संजय बालगुडे, दत्ता बहिरट, बुवासाहेब नलावडे, जयसिंग भोसले, बाळासाहेब मारणे, नीता रजपूत, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, शाबिर खान, राजेंद्र पडवळ, सुरेश कांबळे, चेतन अग्रवाल, राजेंद्र धनवडे, रोहन सुरवसे, स्वाती शिंदे, सौरभ आमराळे, गोरख पळसकर, बबलू कोळी, मंगेश थोरवे, मंगेश कोंडे, नितीन यल्लापूरे, अंजलीताई सोलापूरे, प्रथमेश लभडे, किशोर साळुंखे, संकेत गलांडे, सचिन बहिरट, वाहिद वीयाबानी, नरेश धोत्रे, प्रशांत ओव्हाळ, जीवन चाकणकर, विनय तांबटकर, महेश हराळे, आनंद खन्ना, प्रदीप किराड, अयुब पठाण, उमेश काची, चंद्रकांत चव्हाण, गोपाळ चव्हाण, गणेश उबाळे, प्रवीण बिराजदार, नरेश नलावडे, समीर गांधी, राजश्री अडसूळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.