PMC Rajiv Gandhi Hospital | महापालिकेच्या येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात लवकरच सुरु होणार ऑक्सिजन प्लांट

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

PMC Rajiv Gandhi Hospital | महापालिकेच्या येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात लवकरच सुरु होणार ऑक्सिजन प्लांट

PMC Rajiv Gandhi Hospital Yerwada | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) राजीव गांधी रुग्णालयात (Rajiv Gandhi Hospital) Liquid मेडिकल ऑक्सिजन प्लांट करिता “Ramp” बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाकडून (PMC Health Department) लवकरच प्लांट सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

 अतिरिक्त आयुक्त (विशेष) विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी राजीव गांधी रुग्णालयात  3 ऑक्टोबर  रोजी पाहणी व भेट देऊन भवन विभागाशी संबंधित सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करून दिल्याबद्दल रुग्णालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करून शुभेच्छा देण्यात आल्या. (PMC Pune)
 भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालय येथे दुरुस्तीविषयक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये ऑक्सिजन प्लॉट करिता रॅम्प बांधणे चे काम पूर्ण करण्यात आले आहे. ऑक्सिजन प्लॉट सुरु
करणेबाबतची पुढील कार्यवाही आरोग्य विभागामार्फत केली जाणार आहे.  हॉस्पिटलचे मुख्य शटरची दुरुस्ती करणेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हॉस्पिटलचे मुख्य इन गेट व आऊट गेटची दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या टेरेस वरील मुख्य जल नलिकेवरील पट्टी कॉक नवीन बसविण्यात आला आहे व तेथील लिकेज पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.