PMC JICA Project | Italy Tour | मैलापाण्याच्या गाळापासून पुणे महापालिका तयार करणार खत! | इटली देशातून येणार मशीन

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC JICA Project | Italy Tour | मैलापाण्याच्या गाळापासून पुणे महापालिका तयार करणार खत! | इटली देशातून येणार मशीन

| महापालिका अधिकारी इटलीला जाऊन मशीनची करणार तपासणी

PMC JICA Project | Italy Tour | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने केंद्र सरकारचा जायका प्रकल्प (JICA Project) राबवण्यात येत आहे. या अंतर्गत नवीन 11 मैलाशुद्धीकरण केंद्र (Sewage Treatment Plant) निर्माण करण्यात येणार आहेत. मैलापाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर जो गाळ (Sludge) राहणार आहे, त्यापासून महापालिका खत (Fertiliser) तयार करणार आहे. त्यासाठी इटली देशातून मशीन Sludge Thickener मागवण्यात येणार आहे. दरम्यान या मशीनची पाहणी करण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि काही अधिकारी इटलीला (Italy) जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. (PMC Pune officers Italy Tour)
पुणे महापालिकेच्या वतीने जायका प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहेत. 1100 कोटीच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकार 850 कोटी निधी देणार आहे. त्यापैकी 170 कोटी केंद्र सरकार कडून देण्यात आले आहेत. या प्रकल्पाचा उद्देश हा शहरातून वाहणारी प्रदूषित होऊ नये हा आहे. त्यानुसार पाणी शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे. दरम्यान पाणी शुद्ध करताना प्रक्रिया केल्यानंतर जो गाळ (sludge) शिल्लक राहणार आहे. त्यापासून महापालिका खत तयार करणार आहे. त्यासाठी Sludge Thickeners ही मशिनरी वापरली जाणार आहे. ही मशीन इटली देशातून पुण्यात आणली जाणार आहे. इटली तील Lacto Fungai नावाची कंपनी ही मशीन देणार आहे. दरम्यान या मशीन ची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी येत्या काही दिवसात इटलीला रवाना होणार आहेत. यामध्ये अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे आणि जायका प्रकल्प प्रमुख जगदीश खानोरे यांचा समावेश आहे. दरम्यान याचा सगळा खर्च हा संबंधित कंपनीच करणार आहे. सुरुवातीला चीन देशात दौरा होणार होता. मात्र तिथे असलेले कोरोनाचे सावट अजून न संपल्याने हा दौरा रद्द करून इटलीला जाण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान या मशीनचा आवाका मोठा असल्याने ती विमानातून (Airplane) न आणता जहाजाच्या (Ship) माध्यमातून भारतात आणली जाणार आहे. लाल समुद्राच्या (Red Sea) माध्यमातून ही मशीन भारतात आणण्याचे नियोजन होते. मात्र सद्यस्थितीत लाल समुद्रात समुद्री चाचांनी (Samudri Chacha) धुमाकूळ घातला आहे. हे लोक जहाज लुटून नेत आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या मार्गे ही मशिनरी भारतात आणली जाणार आहे. येत्या काही दिवसांतच ही मशीन पुण्यात दाखल होईल.