Pune Unauthorised Water Tap | अनधिकृत नळजोड तोडण्यावर पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचा भर | यामुळे काही भागात पाणीपुरवठा सुरळीत!

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Pune Unauthorised Water Tap | अनधिकृत नळजोड तोडण्यावर पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचा भर

| यामुळे काही भागात पाणीपुरवठा सुरळीत!

Pune Unauthorised Water Tap – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील काही भागात पाणी टंचाईची तीव्र समस्या (Water Scarcity in Pune) जाणवत आहे. दररोज याबाबत शेकडो तक्रारी महापालिकेकडे (Pune Municipal Corporation (PMC) प्राप्त होत आहेत. यावर उपाय म्हणून महापालिकेने अनधिकृत नळजोड (Illegal Water tap) तोडण्याचा धडाका महापालिका पाणीपुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) सुरु केला आहे. याचा चांगला परिणाम पाहायला मिळत आहे. यामुळे काही भागात पाणीपुरवठा सुरळीत होताना दिसतो आहे. (Pune PMC News)

केशवनगर परिसरात 43 अनधिकृत नळजोडांवर कारवाई!

याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी सांगितले कि, गेल्या काही दिवसापासून केशवनगर भागातून पाणी टंचाई असल्याच्या खूप तक्रारी येत होत्या. या परिसरात शेवटच्या भागात पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे नागरिक त्रासून महापालिकेकडे तक्रारी करत होते. जगताप यांनी सांगितले की, याबाबत आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना याबाबत तपासणी करण्यास सांगितले. यात लक्षात आले कि कुंभारवाडा परिसरात अनधिकृत नळजोड भरपूर आहेत. तिथल्या गोठेधारकांनी आणि नागरिकांनी असे नळजोड घेतले होते. त्यामुळे शेवटच्या भागात पाणी खूप कमी जायचे. त्यानुसार आम्ही या परिसरातील 43 अनधिकृत नळजोडांवर कारवाई करत ते तोडून टाकले. त्यामुळे सर्वच नागरिकांना समप्रमाणात पाणी मिळताना दिसून आले. यामुळे नागरिकांच्या तक्रारी देखील कमी झाल्या आहेत.

अनधिकृत नळजोड न घेण्याचे नागरिकांना आवाहन

खरे पाहता नागरिकांनीच याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. अनधिकृत नळजोड घेऊ नका म्हणून पाणीपुरवठा विभाग नेहमी आवाहन करतो पण त्याला प्रतिसाद नाही. त्यामुळे काही लोकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पाणीपुरवठा विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे कि रीतसर अर्ज करून कनेक्शन घ्या. तशी मागणी आल्यानंतर महापालिका पाणी देते. अनधिकृत कनेक्शन आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.