Pune Unauthorised Water Tap | अनधिकृत नळजोड तोडण्यावर पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचा भर | यामुळे काही भागात पाणीपुरवठा सुरळीत!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Unauthorised Water Tap | अनधिकृत नळजोड तोडण्यावर पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचा भर

| यामुळे काही भागात पाणीपुरवठा सुरळीत!

Pune Unauthorised Water Tap – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील काही भागात पाणी टंचाईची तीव्र समस्या (Water Scarcity in Pune) जाणवत आहे. दररोज याबाबत शेकडो तक्रारी महापालिकेकडे (Pune Municipal Corporation (PMC) प्राप्त होत आहेत. यावर उपाय म्हणून महापालिकेने अनधिकृत नळजोड (Illegal Water tap) तोडण्याचा धडाका महापालिका पाणीपुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) सुरु केला आहे. याचा चांगला परिणाम पाहायला मिळत आहे. यामुळे काही भागात पाणीपुरवठा सुरळीत होताना दिसतो आहे. (Pune PMC News)

केशवनगर परिसरात 43 अनधिकृत नळजोडांवर कारवाई!

याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी सांगितले कि, गेल्या काही दिवसापासून केशवनगर भागातून पाणी टंचाई असल्याच्या खूप तक्रारी येत होत्या. या परिसरात शेवटच्या भागात पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे नागरिक त्रासून महापालिकेकडे तक्रारी करत होते. जगताप यांनी सांगितले की, याबाबत आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना याबाबत तपासणी करण्यास सांगितले. यात लक्षात आले कि कुंभारवाडा परिसरात अनधिकृत नळजोड भरपूर आहेत. तिथल्या गोठेधारकांनी आणि नागरिकांनी असे नळजोड घेतले होते. त्यामुळे शेवटच्या भागात पाणी खूप कमी जायचे. त्यानुसार आम्ही या परिसरातील 43 अनधिकृत नळजोडांवर कारवाई करत ते तोडून टाकले. त्यामुळे सर्वच नागरिकांना समप्रमाणात पाणी मिळताना दिसून आले. यामुळे नागरिकांच्या तक्रारी देखील कमी झाल्या आहेत.

अनधिकृत नळजोड न घेण्याचे नागरिकांना आवाहन

खरे पाहता नागरिकांनीच याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. अनधिकृत नळजोड घेऊ नका म्हणून पाणीपुरवठा विभाग नेहमी आवाहन करतो पण त्याला प्रतिसाद नाही. त्यामुळे काही लोकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पाणीपुरवठा विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे कि रीतसर अर्ज करून कनेक्शन घ्या. तशी मागणी आल्यानंतर महापालिका पाणी देते. अनधिकृत कनेक्शन आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.

Pune Water Cut Latest News |  Water supply will be closed in some part of the Pune city next Wednesday 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Latest News |  Water supply will be closed in some part of the Pune city next Wednesday

Pune Water Cut Latest News |  Pune |  (The Karbhari Online) – Main water line repair work will be done in front of ISKCON Mandir Kanha Hotel on Katraj-Kondhwa road, KK Market area, Bibwewadi on next Wednesday i.e. 6th March.  Therefore, the water supply of this place has to be shut off and it is necessary to complete the repair work urgently.  So on Wednesday KK Market area, Bibvewadi partially, Katraj, Kondhwa Budruk, Rajiv Gandhinagar, Upper, Super Indiranagar, Kondhwa Bu.  There will be no water supply at Gavthan, Lakshminagar.  Water will be supplied with low pressure late in the morning on Thursday (7th).  This information has been given by PMC Chief Engineer Nandkishore Jagtap of Water Supply Department of Pune Municipal Corporation.  (PMC Water Supply Department)

 Area with water supply cut off

Kondhwa B., Upper Indiranagar Area – Sainagar, Gajanan Nagar, Kakade Vasti, Green Park, Rajiv Gandhinagar and some part of Super Indiranagar, ISKCON Temple Area, Kondhwa Budruk Village, Laxminagar, Hagwane Vasti, Ajmera Park, Ashrafnagar, Shantinagar, Salve Garden Area  , Shreyasnagar, Ambikanagar, Pawannagar, Tuljabhavani Nagar, Sargam Nagar, Gokul Nagar, Somnath Nagar, Shivashambho Nagar, Savakash Nagar, Gulmohar Colony, Annabhau Sathe Nagar, Upper Depot Premises, Mahananda Society, Gurukrupa Colony, Srikrishna Colony, Srikunjnagar

 Taljai Zone – Punyanagar, Balajinagar Part, Shankar Maharaj Math Premises, Upper and Lower Indiranagar, Mahesh Society Premises, Manas Society Premises, Padmakunj, Rajayoga Society, Lokesh Society, Shivshankar Society, Kumbhar Vasti, Damodar Nagar, Project Society, Hastinapuram, Monmohan Park  , Todkar Residency, State Bank Colony, Mahalakshminagar, Padmaja Park, Laketown, Chaitraban Colony, Upper and Super Indiranagar Area, Chintamaninagar Part One and Two

Pune Water Cut Latest News | येत्या बुधवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा राहणार बंद | जाणून घ्या परिसर 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Latest News | येत्या बुधवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा राहणार बंद | जाणून घ्या परिसर

 

Pune Water Cut Latest News | पुणे | (The Karbhari Online ) – येत्या बुधवारी म्हणजे ६ मार्च ला  केके मार्केट परिसर, बिबवेवाडी, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिर कान्हा हॉटेल समोर मुख्य पाण्याच्या लाईनच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असून दुरुस्तीचे कामे अत्यावश्यक व तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे बुधवारी केके मार्केट परिसर, बिबवेवाडी अंशत:, कात्रज, कोंढवा बुद्रुक, राजीव गांधीनगर, अप्पर, सुपर इंदिरानगर, कोंढवा बु. गावठाण, लक्ष्मीनगर येथे पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी (दि.7) रोजी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (PMC Chief Engineer Nandkishor Jagtp)  यांनी दिली आहे.  (PMC Water Supply Department)

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

कोंढवा बु., अप्पर इंदिरानगर परिसर – साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानागरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, हगवणे वस्ती, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतीनगर, साळवे गार्डन परिसर, श्रेयसनगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगम नगर, गोकुळ नगर, सोमनाथ नगर, शिवशंभो नगर, सावकाश नगर, गुलमोहर कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर, अप्पर डेपो परिसर, महानंदा सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, श्रीकुंजनगर

तळजाई झोन – पुण्याईनगर, बालाजीनगर पार्ट, शंकर महाराज मठ परिसर, अप्पर व लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज, राजयोग सोसायटी, लोकेश सोसायटी, शिवशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदर नगर, प्रकल्प सोसायटी, हस्तीनापुरम, मोनमोहन पार्क, तोडकर रेसिडन्सी, स्टेट बँक कॉलनी, महालक्ष्मीनगर, पद्मजा पार्क, लेकटाउन, चैत्रबन वसाहत, अप्पर व सुपर इंदिरानगर परिसर, चिंतामणीनगर भाग एक व दोन