Bodybuilding championship | पिंपरी चिंचवडमध्ये रंगणार राज्यस्तरीय “महाराष्ट्र श्री २०२३” शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा

Categories
Breaking News social Sport पुणे महाराष्ट्र
Spread the love

पिंपरी चिंचवडमध्ये रंगणार राज्यस्तरीय “महाराष्ट्र श्री २०२३” शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा

| ४ आणि ५ रोजी होणार स्पर्धा

पुणे, ता. २१ – तरूणांना फिटनेस व शरीर सौष्ठवाच्या लागलेल्या ध्यासाला एक सकारात्मक व हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच उदयोन्मुख व शरीरसौष्ठव पटूना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने पिंपरी चिंचवड येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मान्यता प्राप्त महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन संलग्न बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन, पिंपरी-चिंचवड संघटना व महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष किरण सावंत यांच्या सौजन्याने महाराष्ट्र श्री २०२३ भव्य राज्यस्तरीय शरीरसौष्ठव ही स्पर्धा गुरूवार, ४ मे व शुक्रवार, ५ मे २३ या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या सर्व अजिंक्यपद स्पर्धा सिल्व्हर बँक्वेट हॉल जवळ डांगे चौक रावेत बीआरटी रोड ताथवडे. पिंपरी चिंचवड, पुणे येथे होणार आहे.

यामध्ये पुरुष शरीर सौष्ठव, मेन्स फिजिक, महिला शरीर सौष्ठव व वूमन मॉडेल फिजिक या गटात स्पर्धा असतील. वर्ल्ड बॉडिबिल्डींग अण्ड फिजिक्स स्पोर्ट्स फेडरेशन चे जनरल सेक्रेटरी श्री चेतन पठारे यांच्या शब्दाला मान देऊन ही महाराष्ट्र श्री या स्पर्धेच्या आयोजनासाठी जबाबदारी किरण सावंत यांनी स्वीकारली, महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्ष पदावर निवडून आलेले किरण सावंत यांच्या आज पर्यंत शरीरसौष्ठव या खेळासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी कौतुकास्पद असून भविष्यात ते अजून चांगल्याप्रकारे स्पर्धेचे आयोजन करतील तसेच महाराष्ट्रातील खेळाडूंना वेळोवळी मदत करतील असे वर्ल्ड बॉडिबिल्डींग अण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन व एशियन बॉडीबिल्डींग अण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार श्री. विक्रम रोठे यांनी नमूद केले. या स्पर्धासाठी साऊथ एशियन बॉडिबिल्डींग अँण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रशांत आपटे यांनी शूभेच्छा दिल्या. महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन सेक्रेटरी राजेंद्र चव्हाण आणि खजिनदार सूनिल शेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धचे आयोजन बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी-चिंचवड करत आहे.अशी माहिती आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ही स्पर्धा १२ गटांमध्ये होणार असून महाराष्ट्रातील २२ जिल्हातील खेडाळू सहभाग घेणार आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने मुंबर्ईचा रस्सेल डिब्रोटो, अजिंक्य रेडेकर, नितीन म्हात्रे, निलेश दगडे, सूशांत राजंणकर, उमेश गूप्ता, रोहन गूरव, पिंपरी चिंचवडचा श्रीनिवास वास्के, तोसिफ मोमीन, अदिती बंब, रेणूका मूदलीयार, शितल वाडेकर व तन्विर हक यांच्यामध्ये चुरस होणार आहे. राज्यभरातून अधिकाधिक तरूण- तरूणींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनने केले आहे.

दोन गटात होणार स्पर्धा…

स्पर्धेतंर्गत वजन तपासणी व स्पर्धा होणार आहे. मेन्स फिजिक दोन गटात होणार असून ही स्पर्धा दिनांक गुरूवार, ४ मे रोजी सायंकाळी ४ ते १० या वेळात होईल. तर पुरूष शरीर सौष्ठव आणि महिला शरीर सौष्ठव व वूमन मॉडेल फिजिक स्पोर्ट्स ही स्पर्धा शुक्रवार ५ मे २०२३ रोजी फिजिक वजन तपासणी सकाळी १० ते दुपारी ३ व स्पर्धा संध्याकाळी ५ ते ११ या वेळी होईल.

लाखोंची बक्षिसे…

स्पर्धेतील विजेत्यांना एकूण सहा लाख ५० हजार अशी रोख रकमेची बक्षिसे ट्रॉफी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. तर अजिंक्यपद पटकाविणाऱ्या विजेत्यास १ लाख २५ हजार रूपये, उपविजेत्यास ५० हजार व रनर अप २५ हजार रूपये रकमेचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच उत्तेजनार्थ ६ ते १० क्रमांक स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रूपये व प्रशस्तीपत्र देखील प्रदान केले जाणार आहे. असून मेन्स फिजिक, महिला शरीर सौष्ठव व वूमन मॉडेल फिजिक स्पोर्ट्स महिलांना देखील रोख रकमेची पारितोषिके ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
..
क्रीडा प्रकार व स्पर्धा अधिकधिक तरूण-तरूणींपर्यंत पोहचवणार – किरण सावंत

किरण सावंत यांनी नुकतीच महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. ते स्वतः विविध क्रीडा प्रकार, व्यायाम व फिटनेस विषयी जागरूक असून ते यासंबंधाने ते या बाबतीत कमालीचे पॅशनेट आहेत. हा क्रीडा प्रकार, स्पर्धा, तसेच या क्रीडा प्रकाराप्रति तरूणांमध्ये जागरूकता, आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने अधिक उत्तम व भव्य अशा स्पर्धेसाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, अशी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष किरण सावंत यांनी सांगितले.