Ganesh Visarjan Holiday | गणेश विसर्जनाच्या सुट्टीबाबत पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

Ganesh Visarjan Holiday  | गणेश विसर्जनाच्या सुट्टीबाबत पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी

Ganesh Visarjan Holiday  | अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) निमित्त पुणे जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना उद्या म्हणजे गुरुवारी सुट्टी (Holiday) जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार उद्या पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी आदेश जारी केले आहेत.  दरम्यान या निमित्ताने महापालिका कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्टी मिळणार आहे.
गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) आणि ईद ए मिलादचा (Eid-a-Milad 2023) सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) देखील उद्या कामावर यावे लागणार होते. मात्र यामुळे बराच संभ्रम निर्माण होत होता. मात्र विभागीय आयुक्त कार्यालयाने हा संभ्रम दूर केला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार महापालिका कर्मचाऱ्यांना उद्याच्या सुट्टीबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
 – असे आहेत विभागीय आयुक्त कार्यालयाचे आदेश
शासन निर्णय २७ सप्टेंबर २०२३ चे अधिसुचनेनुसार ई-ए-मिलाद ची शासकिय सुट्टी दिनांक २८ सप्टेंबर २०२३ ऐवजी शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करणेत आली आहे.  २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने पुणे येथे सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणुक काढण्यात येते. नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने प्रतिवर्षी पुणे जिल्ह्याकरीता अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात येते. तथापि  २८ सप्टेंबर रोजीची शासकीय सुट्टी रद्द होवून २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिर केल्याने शासन, राजनैतिक सेवा विभाग, निर्णय अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मी, सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे या नात्याने पुणे जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशी, दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करीत आहे.
| सलग 5 दिवस सुट्टी
दरम्यान या निमित्ताने पुणे महापालिका आणि पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यानुसार उदा 28 सप्टेंबर ला अनंत चतुर्दशीची स्थानिक सुट्टी, 29 ची सार्वजनिक सुट्टी, शनिवार, रविवार आणि सोमवार 2 ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती निमित्त सुट्टी असणार आहे.
——