Alandi Nagar Parishad | आळंदी शहरास भामा आसखेड वरून मिळणाऱ्या पाण्याचा फ्लो वाढवून देण्याची नगरपरिषदेची पुणे महापालिकेकडे मागणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

Alandi Nagar Parishad | आळंदी शहरास भामा आसखेड वरून मिळणाऱ्या पाण्याचा फ्लो वाढवून देण्याची नगरपरिषदेची पुणे महापालिकेकडे मागणी

Alandi Nagar Parishad | आळंदी शहरास (Alandi City) पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) भामा आसखेड प्रकल्पामधून (Bhama Askhed Project) कुरळी येथील केंद्रावरून पाणी पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहरास एक दिवस आड याप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. शहरास मिळणाऱ्या पाण्याचा फ्लो खूपच कमी असल्याने सम खाली गेल्याने पंपिंग वारंवार बंद करावे लागते व जलटाक्या भरण्यास उशीर हातो. यामुळे शहराच्या संपूर्ण पाणी वितरणावर परिणाम होत आहे. त्यामुळे शहरास होणाऱ्या पाण्याचा फ्लो वाढवून मिळावा. अशी मागणी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे (Alandi Nagar parishad CEO Kailas Kendra) यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या पत्रानुसार आळंदी नगरपरिषदेने मागील आठवड्यात पुणे महानगरपालिकेच्या सूचनेनुसार क्रोनीमार्शल कंपनाचा फ्लो मीटरी (जलमापक) बसवून घेतला आहे. यामध्ये शहरास होणारा पाणीपुरवठा ३१४ ते ३१५ m3/h यानुसार होतो आहे. शहरास २४ तासात ७ ते ७.५ mld पाणी (Raw Water) मिळत आहे. पाण्याचा फ्लो कमी असल्याने वारंवार सम खाली जाऊन पंपिंग बंद करावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणी वितरणावर परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत शहरास तीन ते चार दिवसातून एकदा किमान १ तास यानुसार पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहराची पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाली असून आळंदी शहराच्या नागरीकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष स्वरूपात रोजच्या रोज इकडील कार्यालयात तक्रारी प्राप्त होत आहे.
आळंदी नगरपरिषद ही ” क” वर्ग नगरपरिषद असून नगरपरिषदेची अर्थिक स्थिती बिकट आहे. नगरपरिषद स्वनिधीमधुन पुणे महानगरपालिकेच्या भामा आसखेड योजनेची पाणी देयके अदा केली जातात. सद्यस्थितीत नगरपरिषद निधीत उपलब्ध निधीची कमतरता असल्याने मागील काही महिन्यांपासूनची देयके अदा करणेस अडचणी येत आहेत. तरी नगरपरिषद निधी उपलब्ध होईल त्यानुसार थकीत देयके लवकरात लवकर अदा करण्यासाठी प्रयत्नरत आहे. थकीत देयकातील  २०,५१,८६१/- रुपयांचा चेक नुकताच देण्यात आला आहे. त्यामुळे शहरास किमान दिवसाआड पाणी पुरवठा करता यावा याकरिता फ्लो वाढवून मिळावा. अशी मागणी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

Alandi Municipal Council : Irrigation Department : PMC : पाटबंधारे विभागाचा पुणे महापालिकेबाबत अजब न्याय!

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

पाटबंधारे विभागाचा पुणे महापालिकेबाबत अजब न्याय

: आळंदी नगरपरिषदेने पाणी पट्टी भरली नाही म्हणून पुणे महापालिकेला इशारा

पुणे : आळंदी नगर परिषदेने जलसंपदा विभागाची घरगुती पाणी वापराची २४,३७,८०३  इतकी थकबाकी थकवली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने नगर परिषदेला इशारा दिला आहे कि थकबाकी भरा अन्यथा कारवाई केली जाईल. सोबतच जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला देखील इशारा दिला आहे. जलसंपदा विभागाची पूर्ण पाणीपट्टीची रक्कम भरलेशिवाय आपल्या योजनेतून आळंदी नगर परिषदेला  पाणी उचलण्यास परवानगी देणेत येऊ नये. अन्यथा त्यांची थकबाकीची रक्कम आपणाकडून वसूल करणेत येईल. पुणे महापालिकेला दिलेल्या या इशाऱ्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

: आळंदी नगर परिषदेला काय म्हणते पाटबंधारे?

आळंदी नगर परिषद, आळंदी क्षेत्रासाठी इंद्रायणी नदीवरील चिंबळी बंधाऱ्याच्या खालील बाजूस घरगुती कारणासाठी पाणी पुरवठा करण्यात येत होता. जुन्या अभिलेखांची पडताळणी केली असता इंद्रायणी नदीवरील नमूद ठिकाणापासून पाणी पुरवठा करणेसाठी कोणतीच मंजुरी घेतली नसलेबाबत आढळून आले होते. मंजुरी घेऊन पाणी वापर करणेबाबत प्रस्ताव दाखल करणेबाबत  लेखी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तरी इंद्रायणी नदीतून होणारा उपसा पूर्णपणे बंद करण्यात आलेबाबत कळविलेले आहे. तसेच संजीवन समाधी सोहळा तसेच इतर आळंदी वारीनिमित्त आपणास पाणी लागणार आहे किंवा नाही याबाबतदेखील आळंदी परिषदे मार्फत  स्पष्टता यावी. जर पाणी कोटा लागत असेल तर तो रीतसर जलसंपदा विभागाची मंजुरी घेऊन वापर करण्यात यावा अथवा आपणास गरज नसल्यास सदर पाणीकोटाबाबत भविष्यात कोणतीही गरज नाही असे ग्राह्य धरून इतर गरजू बिगर सिंचन ग्राहकास हा पाणी कोटा देणेत येईल. आपणास कोणत्याही कारणास्तव भविष्यात पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. माहे डिसेंबर २०२१ अखेर आपणाकडे २४,३७,८०३/- इतकी थकबाकी आढळून येत आहे. तरी सदरची थकबाकी भरणेबाबत आपल्या पालिकेकडून अनास्था आढळून येत आहे. थकबाकी भरणेबाबत आपणाकडून कोणतीही कार्यवाही होताना आढळून येत नाही. तरी तत्काळ सदरची थकबाकी भरून जलसंपदा विभागास सहकार्य करावे. अन्यथा वरील नमूद रकमेवर व्याजाची रक्कम वाढत राहील. तरी १५ दिवसांच्या आत सर्व थकबाकी भरून सहकार्य करावे. अन्यथा आपल्या आळंदी नगर परिषदेस जलसंपदा विभागा मार्फत होणारा सर्व पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल. 

: पुणे मनपाला काय आहे इशारा?

आळंदी नगर परिषद यांची वरील नमूद थकबाकी असल्या कारणाने, जलसंपदा विभागाची पूर्ण पाणीपट्टीची रक्कम भरलेशिवाय आपल्या योजनेतून त्यांना पाणी उचलण्यास परवानगी देणेत येऊ नये. अन्यथा त्यांची
थकबाकीची रक्कम आपणाकडून वसूल करणेत येईल, याची नोंद घेणेत यावी. तसेच  शाखाधिकारी, भामा आसखेड धरण शाखा, करंजविहीरे यांना देखील इशारा दिला आहे.  आळंदी नगर परिषद यांची वरील नमूद थकबाकी असल्या कारणाने, जलसंपदा विभागाची पूर्ण पाणीपट्टीची रक्कम भरलेशिवाय पुणे महानगर पालिकेच्या योजनेतून त्यांना पाणी उचलण्यास परवानगी देणेत येऊ नये. अन्यथा त्यांची थकबाकीची रक्कम महानगरपालिकेकडून वसूल करणेबाबत विनंती आहे.