Swimmer Sampanna Shelar | पुण्याचा जलतरणपटू संपन्न शेलार याचा अरबी सुमद्रात अनोखा विक्रम!  | सव्वा चार तासांत सुमारे 28.5 किमी अंतर पोहून केले पार 

Categories
Breaking News social Sport देश/विदेश

Swimmer Sampanna Shelar | पुण्याचा जलतरणपटू संपन्न शेलार याचा अरबी सुमद्रात अनोखा विक्रम!

| सव्वा चार तासांत सुमारे 28.5 किमी अंतर पोहून केले पार

Swimmer Sampanna Shelar – (The Karbhari News Service) – पुण्याचा जलतरणपटू संपन्न रमेश शेलार याने अरबी समुद्रात (Arabian Sea) पोहण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे.  गव्हर्नर्स बंगला (Governors Bunglow) ते अटल सेतू (Atal Setu) हे सुमारे 28.5 किमी अंतर त्याने 4:15 तासांत यशस्वीरीत्या पोहून पार केले.  एका प्रक्रियेत हे अंतर कापणारा तो पहिला आणि एकमेव जलतरणपटू बनला आहे.

संपन्न हा पुणे महापालिकेचे अधिकारी डॉ. रमेश शेलार (Dr Ramesh Shelar PMC) यांचा मुलगा आहे. संपन्नची आई शारदा शेलार यांनी त्याला सर्वतोपरी पाठिंबा दिला आणि त्याने हा विक्रम करून दाखवला आहे.
The karbhari - Sampanna Shelar
संपन्न चे जलतरण मधील प्रशिक्षक शेखर खासनीस (Coach Shekhar Khasnis) आणि संपन्न ने हा धाडसी आणि अनोखा प्रयोग करण्याचे ठरवले होते. कारण याआधी असा विक्रम कुणीही प्रस्थापित केला नव्हता. एवढे अंतर एवढ्या वेळात पार करणार तो एकमेव जलतरणपटू बनला आहे. संपन्न च्या या कामगिरीने त्याने परिवारा सोबतच पुणे आणि राज्याची मान देखील उंचावली आहे.

Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर : जनजीवन विस्कळीत  : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा 

Categories
Breaking News महाराष्ट्र

राज्यात पावसाचा कहर : जनजीवन विस्कळीत

: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

पुणे : आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समुह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागर आणि अंदमान समुद्रात आले असून त्याचे येत्या दोन दिवसात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ते ४ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दक्षिण भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

लक्ष्यद्वीप बेट समुहापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सध्या पाऊस पडत आहे. २ डिसेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

३ डिसेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळ आंध्र प्रदेश – ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता 

दक्षिण थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी मध्य अंदमान समुद्र परिसरात आले आहे. ते पश्चिम वायव्य दिशेला सरकून बंगालच्या उपसागरात गुरुवारी प्रवेश करेल. त्यानंतर त्याची तीव्रता वाढत जाईल. त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल. ४ डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश – ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

: 24 तासात अजून धुवांधार 

येत्या २४ तासात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार ला ORANGE इशारा तर मुंबई ठाणे पुणे व इतर काही ठिकाणी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा मध्ये YELLOW इशारा.

मच्छिमारांनी ह्या दरम्यान अरबी समुद्रात जाऊ नये. असे आवाहन -IMD कडून करण्यात आले आहे.