Aarogya Aadalat | महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या समस्या निवारणासाठी “आरोग्य अदालत”

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

महापालिकेचे  वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या समस्या निवारणासाठी “आरोग्य अदालत”

| महापालिका आरोग्य विभागाचा उपक्रम

पुणे | महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या समस्या निवारणासाठी आरोग्य अदालत आयोजित करण्यात येणार आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून याचे आयोजन करण्यात आले आहे. 15 एप्रिल आणि 13 मे अशा दोन दिवशी ही अदालत होईल. असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे विविध प्रकारचे कामकाज चालते. काम करीत असताना अधिकारी तसेच कायम व कंत्राटी सेवक यांच्या अनेक तक्रारी/समस्या आरोग्य खात्याकडे प्राप्त होत असतात. अशा समस्या / तक्रारींवर तक्रार निवारण दिन स्वरुपात आरोग्य अदालतीमध्ये निर्णय घेवून तक्रार/समस्या निकाली काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका यांचेमार्फत “समस्या निवारण दिन’ आयोजित करण्याबाबत प्रस्तावित आहे.
आरोग्य अदालतीमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी (कायम व कंत्राटी) आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्या समस्या स्वतः किंवा संबंधित विभागप्रमुख यांच्यामार्फत दाखल कराव्यात. आरोग्य अदालतीच्या दिवशी देखील सेवक त्यांचे निवेदन सादर करू शकतात. आरोग्य अदालतीस उप आरोग्य अधिकारी, सर्व सहाय्यक आरोग्य अधिकारी, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी, शहर क्षयरोग अधिकारी, प्र. मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी व प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आरोग्य अदालतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे :
‘आरोग्य अदालत’ उपक्रम
शनिवार, १५ एप्रिल २०२३
शनिवार, १३ मे २०२३
वेळ :- सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत
स्थळ:- श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), तिसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका.