Medha Kulkarni | Chandni Chowk Flyover | कोथरूडचे आधुनिक नेते असा उल्लेख करत मेधा कुलकर्णी यांचा भाजपला घरचा आहेर!

Categories
Breaking News Political पुणे

Medha Kulkarni |  Chandni Chowk Flyover | कोथरूडचे आधुनिक नेते असा उल्लेख करत मेधा कुलकर्णी यांचा भाजपला घरचा आहेर!

| माझ्या कामावर बोळा फिरवला जातोय | कुलकर्णींचा आरोप

Medha Kulkarni |  Chandni Chowk Flyover |  भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी भाजपला (BJP) घरचा आहेर दिला आहे. आपल्याला डावलले जात असल्याची तक्रार त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. तसेच कोथरूडचे आधुनिक नेते असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) यांच्यासाठी माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांना सोडावा लागला. त्यानंतर त्यांना अनेक संधीसाठी भाजपकडून डावलण्यात आले. त्यांनी याबाबत वेळोवेळी आपली नाराजी उघडपणे नाही तर, अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. त्यात उद्या (दि. 12) चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी फेसबुक पोस्ट लिहीत मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. (Medha Kulkarni |  Chandni Chowk Flyover)

मेधा कुलकर्णीं यांची फेसबुक पोस्ट काय आहे? 

मेधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पोस्टला त्यांनी ” असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे ” असे शिर्षक दिले आहे. यात त्या म्हणतात की, माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी.

चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?

मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.

गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. कारण माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे.

एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.

——

Chandni Chowk pune new Flyover | चांदणी चौकात आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे

Categories
Breaking News PMC Political पुणे

Chandni Chowk pune new Flyover | चांदणी चौकात आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे

| खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका आयुक्तांना पत्र

Chandni Chowk pune new Flyover | चांदणी चौकात (Chandni chowk pune) नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला (Flyover ) मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट (Senapati Bapat) यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठरेल, असे पत्र त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि पुणे महापालिका आयुक्तांना (Pune PMC Commissioner) पाठवले आहे. (Chandni chowk Pune new Flyover)
मुळशी तालुक्यास मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी  आहे. महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनानी सेनापती बापट यांनी १९२१ या कालखंडात मुळशी येथे शेतकरी व भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारे ‘मुळशी सत्याग्रह’ आंदोलन केले. या मुळशी सत्याग्रहाला नुकतीच शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत. मुळशी तालुक्यासाठी त्यांचे हे मोठे योगदान आहे.  यानिमित्ताने या सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलाच्या प्रकल्पाचे ‘सेनापती बापट उड्डाण पूल’ (Senapati Bapat Flyover) असे नामकरण करावे, त्याद्वारे स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होऊन त्यांचा लढा प्रत्येकाच्या स्मरणात राहील, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. (Chandni chowk Pune News)
पुणे शहराला मुळशी तालुका व परिसरास जोडण्यात या पुलाचा मोठा वाटा असणार आहे. तसेच पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावरील एक महत्वाचे जंक्शन असणार आहे. हा मार्ग  वर्दळीचा असून नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या परिसरात होणारी वाहतूक कोंडी होणे तसेच लहान मोठे अपघात या सारख्या समस्यांबाबत खासदार सुळे या सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच केंद्र सराकरकडे पाठपुरावा करत होत्या. त्यानुसार  राष्ट्रीय महामार्गाचा महत्वाचा प्रकल्प म्हणजेच चांदणी चौकातील पुलाचे नव्याने काम करण्यात येत आहे, याबद्दल महामार्ग प्राधिकरणाचे  त्यांनी आभार मानले आहे.
——
Chandni Chowk Pune New Flyover |  The flyover coming up at Chandni Chowk should be named after Senapati Bapat