Punekar Vs Mumbaikar : एका मुंबईकराचा पुणेकरांना टोला : वाचा आयुक्तांना लिहिलेले पत्र 

Categories
Breaking News PMC social पुणे

एका मुंबईकराचा पुणेकरांना टोला

: पुणेकर आणि पीएमपी विषयी मांडली कैफियत

पुणे : एका मुंबईकराने पुणेकरांना ‘पुणे तिथे काय उणे’ म्हणत चांगलाच टोला लगावला आहे. पुण्यात पीएमपीच्या बस थांब्यावर नावे नसतात आणि पुणेकरांना विचारायला जावे तर ते आपल्याकडे पर ग्रहातून आलेल्या माणसासारखे पाहतात. बस थांबे काय फक्त जाहिरातीतून उत्पन्न मिळवण्याकरिता केले आहेत काय? असा सवाल ही या मुंबईकराने उपस्थित केला आहे. तसेच बस थांब्यावर प्रवाशांच्यासोयीसाठी सुस्पष्ट अक्षरात बस थांब्यांचे नावे लिहावेत. अशी सूचना महापालिका आयुक्तांना केली आहे.

: वाचा आयुक्तांना लिहिलेले पत्र

  “पुणे तिथे काय उणे ” असे पुणेकर स्वाभिमानाने म्हणत असलेतरी पुणे शहरात पीएमटी बसने  प्रवास केला असता प्रकर्षाने दिसणारी ‘उणीव ‘ म्हणजे पुणे शहरातील शहर वाहतूक बसथांब्यांवर’बसथांब्यांची नावे नसणे “.  बसथांबे हे प्रवाशांच्या सोयीपेक्षा त्यावरील जाहिरातींपासून पुणे महानगरपालिकेला उत्पन्न प्राप्त करण्यासाठीचआहेत की काय अशी अवस्था आहे . मोठमोठाल्या जहिरातीने बसथांबेव्यापून टाकलेले असताना बहुतांश बसथांब्यांवर बस थांब्याचे नाव मात्र दिसून येत नाही . बस थांब्यांचे नाव लिहण्यासाठीच्या केवळ पांढऱ्यापाट्या आहेत .

     एकतर पुणेकर मंडळी बसस्टॉप कुठला आहे असे विचारले की हि व्यक्ती कुठल्यातरी परग्रहावरून आल्यासारखे प्रतिसाद देतात. त्यामुळे पुण्यात नव्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागतो .

पुणे महानगर पालिका प्रशासनाला विनंती आहे की , त्यांनी तातडने सर्व बसथांब्यावर थोड्या  बस थोड्या अंतरावर असताना  बसथाब्याचे नाव दिसेल अशा पद्धतीने आडव्या पाट्या लावून नावे लिहावेत . त्याच बरोबर बस थांब्यांवर मध्यभागी देखील सुस्पष्ट दिसेल अशा पद्धतीनेनावे टाकावीत .

हि सुविधा देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बस मध्येपुढील थांबा कुठला आहे हे दर्शवणाऱ्या ‘डिजिटल बोर्ड्स ‘ सुविधा सुरु करावी .

         पुणे महानगरपालिका तातडीने   या मेलच्या  माध्यमातून समोरआणलेल्या पुण्यातील ‘उणीवेची’  दखल घेत सकारात्मक कृतियुक्त  प्रतिसाद देईल या अपेक्षेने पूर्णविराम.

PMC Budget : Commissioner Vikram Kumar : अपरिहार्य कारणास्तव आयुक्त पालिकेचे बजेट 22 फेब्रुवारीला सादर करणार नाहीत 

Categories
Breaking News PMC पुणे

अपरिहार्य कारणास्तव आयुक्त पालिकेचे बजेट 22 फेब्रुवारीला सादर करणार नाहीत

: महापालिका आयुक्त आता 7 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!

:  वाढवून मागितला अवधी

पुणे : महापालिकेचे वर्ष 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार 22 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सादर करणार होते. नियमानुसार आयुक्तांनी 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. मात्र महापालिका निवडणुकीच्या कामकाजामुळे आयुक्तांनी हा अवधी वाढवून मागितला होता. मात्र आयुक्तांनी पुन्हा एकदा कालावधी वाढवून मागितला आहे. 22 फेब्रुवारी च्या ऐवजी 7 मार्च ला बजेट सादर करण्याबाबत प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्याला बुधवारच्या समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
: 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५ नुसार महानगरपालिकेचे महसूली, भांडवली इ. उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आराखडा (“अ” व “क’) अंदाजपत्रक १५ जानेवारी अगर तत्पूर्वी स्थायी समितीस सादर करणे आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट 31 मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो. दरम्यान महापालिका आयुक्तांनी बजेट सादर करण्याची तयारी सुरु केली होती. सर्व विभागाकडून आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करण्याचा अवधी वाढवून मागितला होता. त्यानुसार वर्ष 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार 22 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सादर करणार होते. तसा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यास मंजुरी देखील देण्यात आली होती. मात्र महापालिका आयुक्तांनी पुन्हा कालावधी वाढवून मागितला आहे. 22 फेब्रुवारी च्या ऐवजी 7 मार्च ला बजेट सादर करण्याबाबत प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्याला बुधवारच्या समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

PMC election : Voter list : मतदारांच्या सोयीसाठी  प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार नोंदणी कक्ष स्थापन 

Categories
PMC पुणे

मतदारांच्या सोयीसाठी  प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार नोंदणी कक्ष स्थापन

: महापालिकेने सुरु केली मतदार यादी जनजागृती मोहीम

पुणे :  आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेतर्फे दि. १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये मतदार यादी अद्यावत करणेच्या अनुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याबाबत जनजागृती करणेचीकार्यवाही संयुक्तरित्या जिल्हाधिकारी, पुणे व महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचेतर्फे करण्यात येत आहे.
मतदार यादी अद्यावत करणेच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबतची माहिती पुणे शहरातील नागरिकांना करून देण्यासाठी विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी व प्रचार करण्यात येत आहे. मतदारांच्या सोयीसाठी व मार्गदर्शनासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

: पक्ष नेत्यांसोबत घेतली बैठक

यामध्ये गर्दीच्या ठिकाणी पोस्टर्स लावणे, घंटगाइयांवरून संदेश पसरवणे, मनपाच्या सोशल मीडियाद्वारे प्रचार करणे, विविध स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने जनजागृती करणे इ. स्वरुपाची कार्यवाही पुणे मनपातर्फे करण्यात येत आहे. याबाबत अधिक व्यापक प्रसिद्धीसाठी दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ रोजी महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी सर्व राजकीय पक्षांचे पक्षनेते व पक्षप्रमुख यांची बैठक घेतली. या बैठकीस सुनीता वाडेकर (उप महापौर), हेमंत रासने (अध्यक्ष, स्थायी समिती), गणेश बीडकर (सभागृह नेता), दिपाली धुमाळ (विरोधी पक्षनेता), आबा बागूल (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), पृथ्वीराज सुतार (शिवसेना), साईनाथ बाबर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),  अश्विनी लांडगे (AIMIM), प्रशांत जगताप (राष्ट्रवादी कॉग्रेस), अरविंद शिंदे (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), तसेच सर्व क्षेत्रीय आयुक्त उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये उपआयुक्त (निवडणूक) अजित देशमुख यांनी मतदारयादीमधील नाव नोंदणी व दुरुस्तीबाबतच्या अर्जाची माहिती दिली. नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म नं. 6 वापरावा. स्वत:चे नाव वगळण्यासाठी किंवा इतर व्यक्तीचे नाव मृत्यू झाल्याने / स्थलांतरित झाल्याने वगळण्यासाठी फॉर्म नं. 7 वापरावा. मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती करणेसाठी फॉर्म नं. ८ वापरावा. एकाच मतदारसंघामध्ये पत्या मध्ये दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म नं. ८ अ वापरावा. सदर नोंदणी / दुरुस्ती ही www.nvsp.in या संकेतस्थळावर देखील ऑनलाइन पद्धतीने करता येते. ऑनलाइन प्रक्रिया अधिक सुलभ असून आपल्या अर्जावर झालेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती देखील त्यामध्ये बघता येते तसेच ऑनलाइन मतदार कार्ड डाउनलोड करून घेता येते. मतदारांच्या सोयीसाठी व मार्गदर्शनासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये मतदार नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या सर्व कार्यवाहीची माहिती सदर बैठकीमध्ये देण्यात आली. यावेळेस पदाधिकारी यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले.