Policy : PMC : नगरसेवकांना दिलासा : नगरसेवक खरेदी करू शकणार बकेट, कापडी पिशव्या आणि बेंचेस 

Categories
Breaking News PMC पुणे

नगरसेवक खरेदी करू शकणार बकेट, कापडी पिशव्या आणि बेंचेस

: महापालिका मुख्य सभेने दिली मंजुरी

: नगरसेवकांना दिलासा

 पुणे.  कचऱ्याच्या बादल्या, कापडी पिशव्या, बेंच आणि कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या खरेदीत दिसणाऱ्या गडबडीला सर्वपक्षीय नेत्यांनी ब्रेक लावला होता. त्याबाबत एक धोरण ठरवण्यात आले होते. त्यानुसार  एखाद्या नगरसेवकाला या चार वस्तू खरेदी कराव्या लागणार असतील तर त्या खरेदीसाठी नगरसेवकांना केवळ 10 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.  यापेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार नाही.  सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हे धोरण ठरविण्यात आले होती. या धोरणावर स्थायी समिती आणि महासभेची शिक्कामोर्तब आवश्यक होते. स्थायीने त्यास मान्यता दिली होती. आता याबाबतचा अंतिम निर्णय आजच्या सर्वसाधारण सभेत होणार होता. त्यानुसार सभेने मंजुरी दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांना हा दिलासा मानला जात आहे.

– नागरिकांकडून तक्रारी येत होत्या

 घरोघरी जाऊन कचरा वाटपासाठी नगरसेवकांकडून नागरिकांना प्लास्टिकच्या बादल्या दिल्या जात असतात.  यासोबतच वाहतूक करण्यासाठी वाहनेही उपलब्ध करून दिली आहेत.  या शिवाय नागरिकांसाठी बेंच आणि कापडी पिशव्याही खरेदी केल्या जातात.  या चार वस्तूंच्या खरेदीबाबत वारंवार तक्रारी येत होत्या.  कारण यामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत होती.  याबाबत महासभेतही टीकेची झोड उठली होती.  त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन याबाबत धोरण ठरविण्यात आले.

 – सर्वपक्षीय नेते आणि स्थायीनेही मान्यता दिली

  आता सर्वपक्षीय नेत्यांनी अशा खरेदीला ब्रेक लावला आहे.  आगामी काळात एखाद्या नगरसेवकाला या चार वस्तू खरेदी कराव्या लागणार असतील तर त्या खरेदीसाठी नगरसेवकांना केवळ 10 लाखांचा निधी दिला जाणार आहे.  यापेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार नाही.  म्हणजेच 5 लाखांपर्यंत बादल्यांची खरेदी असेल, तर उर्वरित 5 लाखांच्या बाक, पिशव्या नगरसेवक खरेदी करू शकतात.  सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हे धोरण ठरविण्यात आले.  या धोरणावर स्थायी समिती आणि महासभेची शिक्कामोर्तब आवश्यक आहे.   स्थायीने त्यास मान्यता दिली आहे.  आता याबाबतचा अंतिम निर्णय आजच्या सर्वसाधारण सभेत होणार होता.

PMC : समाविष्ट २३ गावातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बुधवारी मिटणार 

Categories
Breaking News PMC पुणे

समाविष्ट २३ गावातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बुधवारी मिटणार

: उपायुक्त राजेंद्र मुठे यांची मुख्य सभेत माहिती

पुणे : महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र गेल्या ५ महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. याबाबत सोमवारच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठवला. यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला. उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले कि, बुधवारी जिल्हा परिषदेकडून सर्व कर्मचाऱ्यांची यादी आपल्याला मिळणार आहे. त्यांनतर तत्काळ वेतन दिले जाईल.

: गेल्या ५ महिन्यांपासून वेतन नाही

समाविष्ट २३ गावातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. याबाबत भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या कर्मचाऱ्यांना तत्त्काळ वेतन देण्याची मागणी केली. त्यांनतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी हाच विषय मांडला. नगरसेवक बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, सिद्धार्ध धेंडे, सचिन दोडके, वसंत मोरे, यांनी या विषयावर भाषणे केली. अमोल बालवडकर म्हणाले कि, याबाबत राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा करत  प्रशासनाने यात लक्ष घालावे.  लोकांना न्याय देण्यात यावा. बाबुराव चांदेरे म्हणाले, यात महापालिकेची चूक नाही तर जिल्हा परिषदेची आहे.   गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले कि, गेल्या ५ महिन्यापासून वेतन न मिळणे ही गंभीर बाब आहे. महापालिकेने  तत्काळ लक्ष घालावे आणि कामगारांना वेतन देण्यात यावे. विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ म्हणाल्या, याबाबत मी वारंवार आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. मात्र तरी लक्ष दिले गेले नाही. या गावावर का अन्याय करता? आतातरी या लोकांना न्याय द्या. यावर यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला. उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले कि, बुधवारी जिल्हा परिषदेकडून सर्व कर्मचाऱ्यांची यादी आपल्याला मिळणार आहे. त्यांनतर तत्काळ वेतन दिले जाईल.