77th Independence Day | PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Categories
Breaking News cultural PMC social देश/विदेश पुणे

77th Independence Day | PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

77th Independence Day | PMC Pune | भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त (76th Anniversary of Indian Freedom) पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन (Independence Day) उत्साहात साजरा  करण्यात आला. (77th Independence Day | PMC Pune)
 प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली.  त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सकाळी ८.०५ वाजता प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले.

याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade), अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar),  अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane), विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
——-
News Title | 77th Independence Day | PMC Pune | Indian Independence Day celebrated with enthusiasm on behalf of Pune Municipal Corporation

How to Dispose National Flag | 77th Independence Day | राष्ट्रध्वज उतरवण्याचे आणि विल्हेवाट लावण्याचे काही नियम आहेत | ते तुम्हांला माहित असायला हवेत

Categories
Breaking News cultural Education social देश/विदेश संपादकीय

How to Dispose National Flag | 77th Independence Day | राष्ट्रध्वज उतरवण्याचे आणि विल्हेवाट लावण्याचे काही नियम आहेत | ते तुम्हांला माहित असायला हवेत

 How to Dispose National Flag | 77th Independence Day | 15 ऑगस्ट… देशातील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहाने तो साजरा करतो.  हे साजरे करण्यासाठी काही लोक आपल्या घरी तिरंगा (National Flag) फडकवतात…तर काही लोक तो आपल्या घरावर, ऑफिसवर, कारवर किंवा बाईकवर लावतात.  पण हा तिरंगा साजरा केल्यानंतर काय केले पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का?  स्वातंत्र्य दिनाचा उत्सव (Independence Day Celebration) संपताच काही लोक तिरंगा इकडे तिकडे रस्त्यावर फेकतात.  मात्र असे करणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा (National Flag) अपमान आहे. (How to Dispose National Flag | 77th Independence Day)
 राष्ट्रध्वज उतरवण्याचे आणि विल्हेवाट लावण्याचे काही नियम आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?  नसल्यास खाली दिलेल्या नियमांचे पालन करा. (How to dispose Indian national flag post celebration)
 उत्सव साजरा झाल्यानंतर सर्व नियमासहित ध्वज आदराने खाली करण्यात येतो
 राष्ट्रध्वजाचे (National Flag) काय करायचे याबाबत सांस्कृतिक (Ministry of Culture) मंत्रालयाकडून काही वर्षांपूर्वी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती.
 1) प्रथम ध्वज उतरवा आणि क्षैतिज (Horizontal) मोडमध्ये ठेवा.
 २) यानंतर पांढरी पट्टी अशा प्रकारे फोल्ड करा की भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांसह फक्त अशोकचक्र (Ashok Chakra) दिसेल.
 ३) आता दुमडलेला ध्वज पूर्ण आदराने इजा होणार नाही अशा ठिकाणी ठेवा.
 पुढचा प्रश्न येतो की ध्वज खराब झाला किंवा फाटला तर काय करायचं?
 हे सोपे आहे… ध्वजाची हानी होऊ नये म्हणून शक्य तितके प्रयत्न करा, परंतु तरीही जर काही नुकसान झाले तर सांस्कृतिक मंत्रालयाच्या (Ministry of Culture m) भारतीय ध्वज संहितेनुसार (Flag code of India), तो ध्वज खाजगी पद्धतीने नष्ट करा, म्हणजे , एकांतात जाऊन नष्ट करा. तसेच ते पाण्यात बुडवता येते.
 आता प्रश्न येतो की जर कोणी राष्ट्रध्वजाचा (National Flag) अनादर (Disrespect) केला तर त्याला शिक्षा होईल का?
 होय… जर तुम्ही राष्ट्रध्वजाचा अपमान केला असेल तर तुम्हाला त्याची शिक्षा होईल.  म्हणजे… जर कोणी सार्वजनिकरित्या तिरंगा जाळला, तो घाणेरडा केला, चिरडला किंवा नियमाविरुद्ध ध्वज फडकवताना आढळला, तर त्याला 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
 या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या थाटामाटात साजरा करू शकता.
——
News Title | How to Dispose of National Flag | 77th Independence Day | There are certain rules for taking down and disposing of the national flag You should know that

Indépendance Day 2023 | महाराष्ट्रातील 76 पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र

Indépendance Day 2023 | महाराष्ट्रातील 76 पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर

| 3 पोलिस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

| 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर

Independence Day 2023 |  पोलीस सेवेतील (Police Service) उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके (Police Award) जाहीर केली जातात.  राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना  विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (President Police Award) आज जाहीर करण्यात आली.  यासह राज्यातील 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण 76 पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे. (Independence Day 2023)
‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’  पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 954 पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 76 पोलिसांना समावेश आहे.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये  राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांचा समावेश आहे.
राज्यातल्या 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. पोलीस शौर्य पदकांमध्ये रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील,भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे,कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ राज्यातल्या 40 पोलिसांना जाहीर झाले आहे. यामध्ये  प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी, मुंबई), राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे. सविस्तर यादीचा तपशील  www.mha.gov.in आणि  https://awards.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
00000
News Title | Independence Day 2023 | Medals announced to 76 policemen of Maharashtra on the occasion of Independence Day