Marathwada Muktisangram | नितीन चिलवंत यांचा एकनाथ पवार व अरुण पवार यांच्या हस्ते सत्कार

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Marathwada Muktisangram | नितीन चिलवंत यांचा एकनाथ पवार व अरुण पवार यांच्या हस्ते सत्कार

| नितीन चिलवंत यांची शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सदस्यपदी नियुक्ती

 

Marathwada Muktisangram | मराठवाडा मुक्तीसंग्राम (Marathwada Muktisangram) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम नियोजनासाठी गठीत झालेल्या समितीत मराठवाडा जनविकास संघाचे (Marathwada Janvikas Sangh) सदस्य नितीन चिलवंत (Nitin Chilwant) यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टीचे महापालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार (Eknath Pawar) व मराठवाडा जनविकास महाराष्ट्र राज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार (Arun Pawar)  यांच्या हस्ते नितीन चिलवंत यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल लोंढे ही उपस्थित होते. (Marathwada Muktisangram)

नितीन चिलवंत मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयातील स्वातंत्र्यसैनिकाचे नातू आहेत. तसेच मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या कार्यात नेहमी अग्रेसर आहेत. त्यांनी दोन संकल्प केले असून, पिंपरी-चिंचवड व आळंदी येथे कार्यक्रमांचे आयोजन करून आळंदी येथील इंद्रायणी घाटावर ७५ हजार दीप व समई लावून मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव साजरा करणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडावासिय, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती, स्वातंत्र्य सेनानी यांच्या हस्ते तिरंगा ध्वजवंदन करून 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
हे दोन्ही संकल्प चांगले असून, याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन एकनाथ पवार व अरुण पवार यांनी दिले.


News Title |Marathwada Muktisangram | Nitin Chilwant felicitated by Eknath Pawar and Arun Pawar

Marathwada Muktisangram | Tree Plantation | मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने भंडारा डोंगरावर 500 रोपांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपण

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Marathwada Muktisangram | Tree Plantation | मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने भंडारा डोंगरावर 500 रोपांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपण

Marathwada Muktisangram | Tree Plantation | मराठवाडा जनविकास संघ (Marathwada Janvikas Sangh) संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट (Marathwada Charitable Trust) एकसंघ समिती, पिंपरी-चिंचवड शहर (Pimpari Chinchwad city) व राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार (Arun Pawar), सरपंच बालाजी पवार व श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देहूगाव व माऊली भक्त यांच्या संयुक्तपणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर (Bhandara Mountain) येथे ५०० रोपांचे वृक्षारोपण (Tree Plantation) करण्यात आले. (Marathwada Muktisangram : Tree Plantation)

मराठवाडा मुक्तीसंग्राम व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ५००० वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. त्याची सुरुवात भंडारा डोंगर येथे वृक्षारोपण करून करण्यात आली. दरम्यान, अरुण पवार यांनी आवाहन केल्यानंतर भंडारा डोंगर देवस्थान बांधकामासाठी ज्येष्ठ नागरिकांसह युवकांनी मिळून 51 हजार रुपयांचा निधी भंडारा डोंगर देवस्थान सदस्य जगन्नाथ नाटक पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.


यावेळी श्री क्षेत्र भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, सदस्य जगन्नाथ नाटक पाटील, सदस्य गोपाळ पवार, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, रामभाऊ कऱ्हाळे, ह.भ.प. माऊली ढमाले, उद्योजक डी. एस.राठोड, ह.भ.प. डॉ. गजानन वाव्हळ, माजी नगरसेवक आप्पा बागल, आण्णा जोगदंड, संगिता जोगदंड, बळीराम माळी, बाळासाहेब सांळुखे, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती सदस्य नितीन चिलवंत, मराठवाडा जनविकास संघ सोशल मिडीया मराठवाडाप्रमुख अमोल लोंढे, रोहीत जाधव, कॅ. प्रमोद आग्रे, पुष्कराज जोशी, शुभांगी जोशी, हनुमंत काशीद, मुंजाजी भोजने, पुणाजी रोकडे, बळीराम माळी, वृक्षमित्र सोमनाथ कोरे, लक्ष्मण कोन्हाळे, नागेश जाधव, धोडींबा काटे, रेखा दुधभाते, अनिल पाटील, गौतम रोकडे, रंजीत कानकट्टे यांच्यासह भैरवनाथ ज्येष्ठ नागरीक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरीक संघ, श्री. स्वामी समर्थ महिला मंडळ काशीद पार्क, वंदे मातरम् संघटना, आर जे स्पोर्ट अकॅडमी, वारकरी यांच्या उपस्थितीत ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी’ या घोषणा देत वृक्षारोपण करण्यात आले.

५००० वृक्ष लागवडीचा संकल्प : अरुण पवार

मराठवाडा मुक्तीसंग्राम व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ५००० वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. त्याची सुरुवात भंडारा डोंगर येथे 500 रोपांचे वृक्षारोपण करून करण्यात आली. उर्वरित 4500 वृक्ष लागवड धारूर, हिप्परगा रवा, आपसिंगा, मोरडा, वाडी बामणी, केशेगाव, बावी आदी ठिकाणी करण्यात येणार आहे.

——

News Title | Marathwada Muktisangram | Tree Plantation | Plantation of 500 saplings with protective netting on Bhandara hill on behalf of Marathwada Charitable Trust Eksangh Samiti

Marathwada Muktisangram | मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Marathwada Muktisangram | मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार

| मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Marathwada Muktisangram | यंदा मराठवाडा मुक्तीसंग्रामास (Marathwada Muktisangram) 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा आणि शासकीय कार्यालयात 75 हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत, अशी माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे (Dharashiv Collector Dr Sachin Ombase) यांनी दिली. (Marathwada Muktisangram)
             स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण, उपशिक्षणाधिकारी रत्नमाला गायकवाड, पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. गोदभरले, जिल्हा माहिती अधिकारी यासीरुद्दीन काझी, स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर, बुबासाहेब जाधव, विवेक भोसले मुरलीधर होनाळकर, भाऊसाहेब उमाटे, डॉ. सतीश कदम, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते. (Marathwada Muktisangram Din)
            यानिमित्त वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅली, प्रभात फेरी, तसेच स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर आधारित व स्वातंत्र्य लढ्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तिका तयार करण्यात येणार आहेत. 75 हजार रोपांचे वृक्षारोपण व जिल्ह्यातील 75 हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्याबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (Marathwada Muktisangram Divas)
            याबरोबरच मौजे हिप्परगा येथील शाळेतील स्मारकाभोवती संरक्षक भिंत उभी करणे, मौजे इट येथे कार्यक्रम घेणे, तुळजापूर येथे शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करणे. नळदुर्ग, गुंजोटी,देवधानोरा, मराठवाडा मुक्तीसंग्रामात शहिद झालेले आपसिंगा येथील हुतात्मा श्रीधर वर्तक यांची 5 जुलै रोजी जयंती साजरी करणे, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन आरोग्य तपासणी करणे, उस्मानाबाद येथे विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करणे, मौजे चिलवडी येथे स्मृतीस्तंभ उभारणे, 17 सप्टेंबर रोजी सर्व गावांमध्ये दीपोत्सव साजरा करणे, तसेच मराठवाड्यातील जी 52 गावे सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट आहेत, त्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करणे आदी प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
——
News Title | Marathwada Muktisangram |  The Amrit Mahotsav of Marathwada Liberation War will be celebrated this year with various activities