Monsoon Update | हवामान विभागाचा अंदाज | येत्या ४,५ दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र शेती

हवामान विभागाचा अंदाज | येत्या ४,५ दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

| विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता

केरळमध्ये मान्सूनचे आगमण झाल्यानंतर पुढील काही दिवसांत तो महाराष्ट्राच एंट्री करणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. मान्सूनच्या चाहुलीमुळे राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरजार हजेरी लावली आहे. दरम्यान, आता पुढील चार ते पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच विदर्भातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रदेशातील नागरिकांना उष्णता आणि पावसापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. याउलट विदर्भात मात्र उष्णतेची लाट येणार आहे. महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने विशेष करुन किनारपट्टीवरील नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे.दरम्यान, कोकण किनारपट्टीसह, पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती अधिक अनुकूल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ सोडून राज्यातील इतरही काही भाग जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सोसाट्याचा वारादेखील वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.पावसाचे आगमन वेळेआधी होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून टाकली आहेत. तर काही ठिकाणी अजूनही शेती कामांची धांदल सुरु आहे. त्यामुळे आता शेतकरी पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. कोकण किनारपट्टीवर पावसासाठी अनुकूल परिस्थिती असली, तरी मुंबईत पावसाच्या आगमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, अशी माहितीही  दिली होती.