PMC | News Post | पुणे महापालिका निर्माण करणार नवीन 549 पदे! | वर्ग 1 ते 4 मधील पदे

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिका निर्माण करणार नवीन 549 पदे!

| वर्ग 1 ते 4 मधील पदे | नवीन उमेदवारांना चांगली संधी

| राज्य सरकारला पाठवला जाणार प्रस्ताव
पुणे | पुणे महापालिका हद्दीत 34 गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे हद्दवाढी बरोबरच कामाचा बोज देखील वाढला आहे. मात्र कर्मचाऱ्यांची कमी असल्याने बऱ्याच अडचणी येत आहेत. हा बोज कमी करण्यासाठी तसेच विविध खात्यांच्या मागणीनुसार महापालिका आपल्या आकृतिबंधामध्ये 549 नवीन पदे निर्माण करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल.
महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावानुसार  नगर विकास विभाग यांनी प्रारीत केलेल्या अधिसूचनेनुसार तत्कालीन अकरा ग्रामपंचायतीकडील कार्यरत ५०० कर्मचायांचे पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदावर समावेशन करण्यात आले आहे. त्यानुसार ५०० विविध पदांची पदनिर्मिती करणे आवश्यक आहे. तसेच नगर विकास विभाग यांनी प्रारीत केलेल्या २३ ग्रामपंचायातीकडील काही अटी शर्तीच्या अधीन राहून कार्यरत ठेवलेले ४३५ कर्मचारी यांना आज्ञापत्रकान्वये पुणे महानगरपालिका आस्थापनेवर कायम समावेशन करण्यात आलेले नसून सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीची, सेवाविषयक व इतर कागदपत्रे तपासणी अंती काही तफावत किंवा अनियमितता आढळल्यास त्याप्रमाणे कार्यवाही करून त्यानुसार प्रशासन अंतिम निर्णय घेईल याची संबंधितानी नोंद घ्यावयाची आहे या अटीच्या अधिन राहून ग्रामपंचायतकडे कार्यरत असताना जे वेतन
होते, ते वेतन देऊन कार्यरत ठेवण्यात आलेले आहे. तसेच १९ कर्मचारी यांचेबाबत जिल्हा परिषद पुणे यांचे प्रशासनाकडून घेण्यात येणाच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, या अटीच्या अधिन राहून ग्रामपंचायतकडे कार्यरत असतानी जे वेतन होते ते वेतन देऊन कार्यारत ठेवण्यात आलेले आहे. म्हणजेच
आजरोजी तत्कालीन ग्रामपंचायतीकडील ४५४ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच  शहर अभियंता यांनी मुख्य अभियंता (स्थापत्य) ते कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण ७१४ पदांची पद निर्मितीबाबत या विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुषंगाने अकरा ग्रामपंचायतिकडील ५०० तेवीस ग्रामपंचायतीकडील ४५४ व  शहर अभियंता यांनी सादर केलेल्या ७१४ पदांचा प्रस्ताव व इतर काही विभागांचा प्रस्ताव
विचारात घेऊन एकूण १४९२ पदांचा पुणे महानगरपालिका आस्थापना विभाग पदनिर्मिती सेवक तक्ता तयार करून प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावावर  महापालिका आयुक्त यांनी अतिरिक्त आयुक्त, लेखापाल यांच्यासोबत बैठक घेण्यास सांगितले होते.
  त्यानुसार .०९/०२/२०२३ रोजी मा. महापालिका आयुक्त यांच्या समवेत सह महापालिका आयुक्त, मुख्य लेखापरिक्षक विभाग, सह महापालिका आयुक्त, मुख्यलेखा व वित्तविभाग व उप आयुक्त,
सामान्य प्रशासन विभाग, पुणे मनपा पदनिर्मिती प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत ०४/१०/२०१७ रोजी समाविष्ट झालेल्या तत्कालीन अकरा ग्रामपंचायतीकडील सेवकांचे समावेशन पुणे मनपाच्या मनपाच्या रिक्त पदावर झाले आहे. याबाबत खातरजमा करावी व त्यादृष्टीने पदनिर्मिती सुचवावी जेणेकरून आस्थापना खर्चात अवाजवी वाढ होणार नाही. त्यादृष्टीने खातरजमा केली असता यापूर्वीच समावेशन केलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे रिक्त पदामध्ये समायोजन झाले असून सफाई सेवकांच्या एकूण १८७ पदे आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सफाई सेवकांच्या १४७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे १८६ सफाई सेवकांच्या जागांपैकी ३९ जागांची आवश्यकता आहे. तसेच दि.३०/०६/२०२१ रोजी समाविष्ट झालेल्या तत्कालीन तेविस ग्रामपंचायतीकडील सेवकांचे प्रथमतः पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदांवर समावेशन करावे व उर्वरित सेवकांच्या समावेशनाबाबत आवश्यक असलेल्या पदसंख्या व इतर संवर्गातील पदांची पदसंख्या कमी करून पदनिर्मिती प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी स्थायी समिती मार्फत मुख्य सभेकडे सादर करावे असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने वर्ग-१ ते वर्ग-४ मधील पदांचा ५४९ पदांचा पदनिर्मितीबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे.
यामध्ये वर्ग 1 ते 4 मधील पदांचा समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त कार्यालय, भूसंपादन विभाग, प्रकल्प आणि नियोजन विभाग, पाणीपुरवठा, पथ, विद्युत विभाग, नगरसचिव, कर संकलन, नगर अभियंता, पर्यावरण विभाग, प्राणी संग्रहालय, भवन रचना, नगर रचना, वाहतूक नियोजन, आरोग्य कार्यालय, घनकचरा, दक्षता विभाग अशा सर्वच विभागातील पदाचा समावेश आहे. या पदनिर्मितीच्या प्रस्तावाला स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल. सरकारची मंजुरी मिळाल्यांनतरच त्यावर अंमल करता येणार आहे.