PMC Pune Budget | नागरिकांनो महापालिकेच्या बजेट मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या परिसरात 75 लाखापर्यंत कामे सुचवा

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Budget | नागरिकांनो महापालिकेच्या बजेट मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या परिसरात 75 लाखापर्यंत कामे सुचवा 

| 31 ऑगस्ट पर्यंत नागरिक देऊ शकतात कामे

PMC Pune Budget | सन २००६-०७ पासून पुणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक (Pune Municipal Corporation Budget) तयार करताना नागरिकांच्या सूचनेनुसार आवश्यक कामांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करणे, असा उपक्रम पुणे शहरात सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2024-25 च्या बजेट मध्ये देखील नागरिक कामे सुचवू शकतात. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाकडून (PMC Ward Office) विनामूल्य अर्ज उपलब्ध करून दिले जातात.  हे अर्ज नागरिकांना online पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील. दरम्यान नागरिक यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत आपल्या प्रभागातील कामे सुचवू शकतात. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Pune Budget)
सन 2024-25  चे अंदाजपत्रक तयार करताना महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे स्तरावर नागरिकांकडून
त्यांच्या प्रभागात करावयाच्या कामांबाबतच्या सूचनांचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करून घ्यायचा आहे. त्यासाठी प्रशासक तथा महापालिका आयुक्त (प्रभाग समिती अध्यक्ष) यांचे अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची बैठक प्रस्तुत प्रयोजनाचे विचारार्थ बोलविण्यात यावी, त्या बैठकीमध्ये नागरिकांच्या अंदाजपत्रक सहभागाबाबत चर्चा घडवून आणावी. नागरिकांच्या सहभागातून अंदाजपत्रक तयार करणेबाबतचा प्रारूप कार्य आराखडा तयार करण्यात यावा. प्रभाग समितीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार दैनिक वृत्तपत्रात जाहीर आवाहन करून नागरिकांकडून
कामाचे प्रस्ताव 31 ऑगस्ट अखेर मागविण्यात यावे. प्रभागामध्ये तीन सदस्यांचा प्रभाग असल्यास त्या प्रभागास कमाल रक्कम रुपये ७५ लाख तसेच २ सदस्यांचा प्रभाग असल्यास कमाल रक्कम रुपये ५० लाखाची मर्यादा ठेवावी. तसेच एका कामाची रक्कम रुपये ५ लाखापेक्षा जास्त नसावी. नागरिकांकडून आलेले प्रस्ताव  प्रभाग समितीकडे अंतिमतः प्राधान्यक्रम ठरविणे व मान्यतेसाठी
पाठविण्यात यावे. तसेच प्रभाग समितीच्या मान्यतेनंतर महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व प्रभागाची एकवट माहिती, नियतकालिक अर्थसंकल्प विचारार्थ महापालिका आयुक्त यांचेकडे 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावी. असे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation News)
—–
News Title | PMC Pune Budget | Citizens participate in the municipal budget and suggest works up to 75 lakhs in your area