Pune Metro : पहिल्या दिवशी 37 हजार तर दुसऱ्या दिवशी 18 हजार लोकांचा पुणे मेट्रोने प्रवास

Categories
social पुणे

पहिल्या दिवशी 37 हजार तर दुसऱ्या दिवशी 18 हजार लोकांचा पुणे मेट्रोने प्रवास 

: पुणे मेट्रोला  उदंड प्रतिसाद

पुणे : मेट्रोचे पंतप्रधाननरेन्द्र मोदी  यांनी उदघाटन  केल्यानंतर दुपारी ३ वाजेपासून गरवारे ते वनाज , आणिपीसीएमसी ते फुगेवाडी  या मार्गावर मेट्रो सेवा सुरु करण्यात आली. दुपारी २ वाजल्यापासून स्थानकांवर लोक  येण्यास सुरवात झाली.

 पुणेआणि पीसीएमसी  नागरिकांमध्ये  प्रचंड  उत्साह दिसत होता. मोठ्यासंख्यने गृहिणी , जेष्ठ नागरिक , महाविद्यालयीन विध्यार्थी , लहान मुले , संपूर्ण कुटुंब , महाविद्यालयीन ग्रुप  इत्यादी  नागरिक मोठ्या उत्साहाने मेट्रो स्थानकांवर येत होते आणि मेट्रोने प्रवास करत होते.

      पुण्यात मेट्रो रेल्वे चालू होऊन पहिल्याच दिवशी म्हणजे ६ मार्च२०२२ रोजी दुपारी ३ ते रात्री ९:३० पर्यंत  ३७७५२ लोकांनी प्रवास केला. प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड उत्साहाचे  वातावरण होते. गरवारेस्थानकात असलेली प्रदर्शनी हा एक सेल्फी पॉईंट झाला आहे. मेट्रोमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर प्रवासी फोटो, सेल्फी , घेत होते. पूर्ण स्टेशनजय भवानी , जय शिवाजी , गणपती बाप्पा मोरया  अश्या घोषणांनी दुमदुमले होते.

   दि. ०७.०३.२०२२ रोजी देखील तेवढ्याच उत्साहाने   नागरिक मेट्रोरेल्वे स्थानकात येत होते संध्याकाळी  पाच वाजेपर्यंत १८४३९ प्रवाश्यानीमेट्रो सेवेचा वापर केला. त्यामध्ये पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाज तेगरवारे या मार्गिके मध्ये प्रवास केला आहे.

PM Modi pune Tour : Prashant Jagtap : पुणे, पिंपरी मनपा हातातून जाणार म्हणून मोदींना पाचारण 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे, पिंपरी मनपा हातातून जाणार म्हणून मोदींना पाचारण

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपला टोला

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पानिपत होणार आहे याची चाहूल लागताच भाजपच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाचारण करण्यात येत आहे. असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस  चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपला लगावला आहे.

जगताप म्हणाले, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची एकही संधी स्वतः नरेंद्र मोदींनीही सोडली नाही. छत्रपतींच्या महाराष्ट्राने देशाला कोरोना दिला असे वक्तव्य करत त्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याचा अवमान केला. संघाचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला. ही ‘छिंदम’ प्रवृत्ती भाजप आणि आरएसएस च्या नसानसांत भिनलेली आहे. असे असतानाही मतांचे राजकारण करण्यासाठी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा आवर्जून वापर भाजपकडून होतो.

जगताप पुढे म्हणाले,  महानगरपालिका आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व उठून दिसावं, त्यांची बडदास्त ठेवता यावी म्हणून हा कार्यक्रम केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत करण्याचा भाजपचा डाव आहे. पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे, पुणे शहरात शिवरायांचं बालपण गेलं, असं असताना पुतळ्याचे अनावरण भव्यदिव्य सोहळ्यात होणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता केवळ नरेंद्र मोदी व भाजप यांच्यापुरता हा सोहळा मर्यादित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
हा शिवद्रोह आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही येत्या ६ मार्च रोजी याचा तीव्र निषेध करणार आहोत याची भारतीय जनता पक्षाने नोंद घ्यावी.

PCMC : Chanda Lokhande : पिंपरीच्या भाजपच्या नगरसेविका चंदाताई लोखंडे यांचा भाजपला रामराम;  राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत

Categories
Breaking News Political पुणे

पिंपरीच्या भाजपच्या नगरसेविका चंदाताई लोखंडे यांचा भाजपला रामराम;  राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत

: भाजप नेते आणि प्रभागातील सहकारी नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा – चंदाताई लोखंडे

पिंपरी : भाजपचे नेते, प्रभागातील स्थानिक नगरसेवकांनी पाच वर्षात प्रचंड त्रास दिला. कोणतीही कामे होऊ दिली नाहीत. या त्रासाला कंटाळून भाजप नगरसेविका चंदाताई लोखंडे यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. लवकरच आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे चंदाताई लोखंडे यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या नगरसेविका चंदाताई लोखंडे यांनी आपला राजीनामा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक राजू लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण पवार, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मयूर कलाटे, नगरसेवक राजू बनसोडे, सुलक्षणा शिलवंत – धर उपस्थित होते.

चंदाताई लोखंडे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले, की मी पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 29 चे महापालिकेत प्रतिनिधीत्व करीत होते. पिंपळे गुरव, वैदुवस्ती भागातून मी निवडून आले होते. निवडून आल्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविताना अनंत अडचणी आणल्या. चार सदस्यांचा प्रभाग असलेल्या या प्रभागात प्रथमपासूनच आपणास न विचारता भाजप नेते निर्णय घेत होते. प्रभागातील अन्य नगरसेवक व भाजप नेत्यांकडून जाणूनबुजून त्रास देण्यात आला. नागरिकांच्या समस्या सोडवताना सतत आडकाठी आणली. प्रभागातील विकासकामे करताना हेतुपुरस्सर त्रास दिल्याने विकासकामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत.
विविध अडचणी आमच्यासमोर उभ्या केल्या. त्रास असाह्य झाला होता. या त्रासाला कंटाळून आज भाजप नगरसेविकापदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच आपली पुढची भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी भाजपला सुरुंग लावला असून, एकापाठोपाठ एक भाजप पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे निष्ठावंत अरुण पवार, माजी नगरसेवक राजू लोखंडे, मनसेचे शहर पातळीवरील नेते प्रदीप गायकवाड, आदिवासी समाजाचे नेते प्रा. विष्णू शेळके, बंजारा समाजाचे नेते संदीप राठोड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश राजेंद्र जगताप यांनी घडवून आणला आहे. आणि आता भाजपच्या विद्यमान नगरसेविका चंदाताई लोखंडे यांच्या भाजप नगरसेविकापदाचा राजीनामा देण्यामागे राजेंद्र जगताप यांचे राजकीय डावपेच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही दिवसात चंदाताई लोखंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशनिश्चित मानला जात आहे.

PCMC : PMC : पिंपरी मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! : पुण्याचे कधी वाजणार? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पिंपरी मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले!

:पुण्याचे कधी वाजणार?

 

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका(PCMC)  निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आगामी निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. पुणे महापालिकेची(Pune Municipal Corporation) प्रभाग रचना हि १ फेब्रुवारी लाच जाहीर होण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवच्या प्रभाग रचनेसाठी प्राप्त हरकती 16 फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. 26 फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी 2 मार्च 2022 रोजी निवडणूक आयोगाला(State Election Commission) पाठवावे लागणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे.

पुण्याच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. आयोगाने सांगितले आहे कि अगोदर प्रभाग रचना जाहीर होणार. त्यांनतर निवडणुकीचा कर्यक्रम असेल. त्यानुसार पुण्याच्या प्रभाग रचनेची उत्सुकता सर्वांना आहे.