PM Modi PMC tour : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नगरसेवकांना उपस्थित राहण्याची संधी  : 250 जणांना परवानगी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नगरसेवकांना उपस्थित राहण्याची संधी

: 250 जणांना परवानगी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पतुळ्याचे अनावरण पुणे मनपा आवारात होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी महापालिका भवनात येणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमासाठी अवघ्या 25 ते 30 जणांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यातही नगरसेवकांनाही या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यावर त्यावरून वाद सुरू झाला होता. मात्र, या वादावर अखेर पडदा पडला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे 200 ते 250 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. त्यामुळे नगरसेवकांसह अधिकारी तसेच कार्यक्रमाशी संबधित कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी महापालिकेत उपलब्ध असलेली जागा व पंतप्रधानांचा ताफा याचा विचार करता सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्‍या उपस्थितांत हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबधित कार्यक्रम भाजप अल्प उपस्थितीत करत असल्याची टीका सुरू झाली होती. मात्र, अखेर सुरक्षा यंत्रणेशी चर्चा करून नगरसेवकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू देण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच महापालिकेचे व्यवस्थेतील अधिकारी, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्पीकर, सजावट, मांडव यासह इतर कामासाठी असलेले कर्मचारी यांना पास दिले जाणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

PM Modi pune Tour : Prashant Jagtap : पुणे, पिंपरी मनपा हातातून जाणार म्हणून मोदींना पाचारण 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे, पिंपरी मनपा हातातून जाणार म्हणून मोदींना पाचारण

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपला टोला

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पानिपत होणार आहे याची चाहूल लागताच भाजपच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाचारण करण्यात येत आहे. असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस  चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपला लगावला आहे.

जगताप म्हणाले, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची एकही संधी स्वतः नरेंद्र मोदींनीही सोडली नाही. छत्रपतींच्या महाराष्ट्राने देशाला कोरोना दिला असे वक्तव्य करत त्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याचा अवमान केला. संघाचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला. ही ‘छिंदम’ प्रवृत्ती भाजप आणि आरएसएस च्या नसानसांत भिनलेली आहे. असे असतानाही मतांचे राजकारण करण्यासाठी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा आवर्जून वापर भाजपकडून होतो.

जगताप पुढे म्हणाले,  महानगरपालिका आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व उठून दिसावं, त्यांची बडदास्त ठेवता यावी म्हणून हा कार्यक्रम केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत करण्याचा भाजपचा डाव आहे. पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे, पुणे शहरात शिवरायांचं बालपण गेलं, असं असताना पुतळ्याचे अनावरण भव्यदिव्य सोहळ्यात होणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता केवळ नरेंद्र मोदी व भाजप यांच्यापुरता हा सोहळा मर्यादित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
हा शिवद्रोह आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही येत्या ६ मार्च रोजी याचा तीव्र निषेध करणार आहोत याची भारतीय जनता पक्षाने नोंद घ्यावी.

PM Modi Pune Tour : ६ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “मोदी गो बॅक आंदोलन” 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

६ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “मोदी गो बॅक आंदोलन”

: पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस “मोदी गो बॅक आंदोलन” ६ मार्चला संपूर्ण पुणे शहरात करणार आहे. या महाराष्ट्रद्रोही भाजप सरकारने दुटप्पीपणाने आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे. अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे. अशी माहिती पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. क्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे.

मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच त्यांच्या स्वराज्य भूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे. अगदी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना काळाचा संदर्भ देत स्वराज्य भूमी महाराष्ट्राचा अपमान केला.त्याच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमधील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा घाट पुणे भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी घातला आहे.

याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “मोदी गो बॅक आंदोलन” ६ मार्चला संपूर्ण पुणे शहरात करणार आहे. या महाराष्ट्रद्रोही भाजप सरकारने दुटप्पीपणाने आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे. अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे.

PM Modi Pune Tour : Murlidhar Mohol : पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी!

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी

– महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अधिकाऱ्यांसह आढावा

– बैठक आणि प्रत्यक्ष पाहणी करत दौऱ्याचे नियोजन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी सुरु असून महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक घेऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. येत्या ६ मार्च रोजी होणाऱ्या या दौऱ्यात पुणे महापालिका, गरवारे मेट्रो स्टेशन येथे पंतप्रधान मोदी भेट देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याच सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्यात आला.(PM Modi will come pune On 6th March)

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या नियोजन बैठकीस पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे महासंचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर,पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमपीएमएल अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कांॅग्रेस गटनेते आबा बागुल,सेनेचे गटनेते,पृथ्वीराज सुतार आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘भूमिपूजन केलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पणसाठीही पंतप्रधान मोदी शहरात येताहेत ही समस्त पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे. पुणे महापालिका आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळा स्मारकाचे आणि पुणेकरांचे स्वप्न असणाऱ्या मेट्रोचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. शिवाय पंतप्रधान मोदी मेट्रोच्या गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास करणार असून जवळ असणाऱ्या मैदानावर पुणेकरांना जाहीर कार्यक्रमाद्वारे संबोधित करण्याचेही प्रस्तावित आहे. या दृष्टीने आढावा घेतला’.

‘पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात महापालिका, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो या सर्वांशी समनव्यय ठेऊन सूक्ष्म नियोजन केले जात आहे. आढावा बैठकीत सर्व ठिकाणांचा आढावा घेतला गेला असून याचा अहवाल शासकीय पातळीवर पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. याबाबत आढावा घेऊन पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम नियोजन जाहीर केले जाणार आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.