PMC Unique Pune Walk | पुणे महापालिकेचा पहिला “युनिक पुणे वॉक”

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Unique Pune Walk | पुणे महापालिकेचा पहिला “युनिक पुणे वॉक”

PMC Unique Pune Walk | पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या (Pune Municipal Corporation Cycle Club) वतीने इतिहास, पर्यावरण, फिटनेस आणि पर्यटनासाठीच्या नागरी सुविधा या सर्वांचा मेळ घालणारा पहिला “युनिक पुणे वॉक” (Unique Pune Walk) तळजाई टेकडी येथे शनिवार  १ जुलै रोजी सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत आयोजित करण्यात आला होता. या वॉक मध्ये जवळपास ४० अधिकारी सहभागी झाले होते. (PMC Unique Pune Walk)
 प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी अशा प्रकारच्या वॉकचे (Pune Walk) शहरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. ह्या वॉक मध्ये  विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन माधव जगताप उपायुक्त, अतिक्रमण विभाग (Deputy Commissioner Madhav Jagtap) व सायकल क्लबचे सुरेश परदेशी (Suresh Pardeshi) यांनी केले.
—-
News Title | PMC Unique Pune Walk | Pune Municipal Corporation’s first “Unique Pune Walk”

PMC : Taljai hills : तळजाई टेकडी प्रकल्पात वृक्षतोड नाही  : महापालिका उद्यान विभागाचे स्पष्टीकरण 

Categories
PMC पुणे

तळजाई टेकडी प्रकल्पात वृक्षतोड नाही

: महापालिका उद्यान विभागाचे स्पष्टीकरण

पुणे : सहकारनगर भागातील भागातील पुण्याच्या ऑक्सिजन मानला जाणाऱ्या तळजाई टेकडीवर १०७ एकर जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प तयार होणार आहे. परंतु मनोरंजनाच्या नावाखाली तळजाईवर गर्दी करून निसर्गाची हानी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुळात हे नैसर्गिक जंगल असताना, पुरेशी जैवविविधता असताना झाडे तोडून रस्ते व बांधकाम करून कोणती जैवविविधता निर्माण करण्यात येणार? असा प्रश्न पर्यावरण प्रेमी आणि नागरिकंनाकडून विचारला जात होता. त्यावरच  महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.

वृक्ष संपदा महापालिकेकडून जपण्यात येणार

तळजाईवर उभारण्यात येणाऱ्या जैवविविधता उद्यान प्रकल्पामध्ये दुर्मिळ वृक्ष तसेच स्थानिक /भारतीय वृक्ष संपदा महापालिकेकडून जपण्यात येणार आहे. तसेच १९८७ च्या डीपी (विकास आराखडा) नुसार याठिकाणी असलेले हिल टॉप हिल स्लोप झोनचे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. अशी माहिती महापालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सदर प्रकल्पाचा अहवाल स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, समितीच्या आदेशानुसार त्याचे लवकरच सादरीकरण करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाने सांगितले आहे. या प्रकल्पामध्ये बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान, जैवविविधता उद्यान, फ्लॉवर गार्डन, अरोमा गार्डन, रानमेवा उद्यान, सेंद्रिय शेती, पक्षी निरीक्षण केंद्र, आदी सुविधा उभारण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे करीत असताना कुठलीही वृक्षतोड न करता, जास्तीच कॉंक्रिटीकरण करण्यात येणार नाही़ तसेच येथील जॉगिंग ट्रॅकही मातीचेच करण्यात येणार आहे. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये याठिकाणी वाढ करून प्रकल्पामध्ये सर्व सोयीसुविधा उभारून नागरिकांना त्यांच्या आरोग्य व मनोरंजन याकरिता या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले असल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे.