PMPML Cashless Payment | पीएमपीएमएलने मेट्रो सोबत यंत्रणा कनेक्ट करावी | पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

Categories
Breaking News Political social पुणे

PMPML Cashless Payment | पीएमपीएमएलने मेट्रो सोबत यंत्रणा कनेक्ट करावी | पालकमंत्री चंद्रकांत पाटील

| पीएमपीएमएलच्या कॅशलेस सुविधेचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

 

PMPML Cashless Payment |पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक (Pune Public Transport) बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असून त्यामुळे नागरिकांना आपली वाहने घेऊन बाहेर पडावे लागणार नाही. तसेच एकाच तिकीट यंत्रणेमध्ये पुणेकर प्रवाशांना पीएमपीएमएल (PMPML) व मेट्रोमध्येही (Pune Metro)  सोयीस्करपणे प्रवास करता यावा यासाठी पीएमपीएमएलनेही मेट्रो सोबत यंत्रणा कनेक्ट करावी. असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

 

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कॅशलेस पेमेंट सुविधेचा (PMPML Cashless Payment Facility) शुभारंभ  १ ऑक्टोबर रोजी महामंडळाच्या कोथरूड आगार येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह, सहव्यवस्थापकीय संचालक  नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार – पवार, माजी नगरसेवक गणेशभाऊ वरपे, . नवनाथभाऊ जाधव, . अजयभाऊ मारणे, किरण दगडे-पाटील, अल्पनाताई वरपे, मा. श्री. दिलीप वेढे-पाटील, डॉ. संदीपजी बुटाला बाळासाहेब डेमकर, मा. श्री. नितीनजी शिंदे, वैभव मुरकुटे,  मंदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ई – तिकीट मशीन मध्ये कॅशलेस पेमेंट द्वारे तिकीट काढून सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी पुढे बोलताना  पाटील म्हणाले की, “डिजिटल व्यवहार वाढणे बाबत लोकांची खूप मोठी मागणी होतीतसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांचा आग्रह आहे, त्यानुसार तिकिटासाठी पीएमपीएमएलने ही आज कॅशलेस पेमेंट सुविधा सुरु केली आहे. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असून त्यामुळे नागरिकांना आपली वाहने घेऊन बाहेर पडावे लागणार नाही. तसेच एकाच तिकीट यंत्रणेमध्ये पुणेकर प्रवाशांना पीएमपीएमएल व मेट्रोमध्येही
सोयीस्करपणे प्रवास करता यावा यासाठी पीएमपीएमएलनेही मेट्रो सोबत यंत्रणा कनेक्ट करावी असे ते म्हणाले.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा.  सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले की,“ गेल्या तीन महिन्यापासून पीएमपीएमएल नागारीकांना चांगली सुविधा देण्यासाठी बरेच प्रयत्न करीत आहे, याबाबत
पालकमंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांनीही दोन वेळा येऊन आढावा घेतला, पीएमपीएमएलमध्ये प्रवासी संख्या वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येथील यासाठी आम्ही बसेस मधून प्रवास करून नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व प्रवासीभिमुख सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अनेक प्रवासी नागरिकांनी कॅशलेस पेमेंट द्वारे तिकीट मिळण्याची मागणी केली त्यानंतर बाणेर डेपो येथे यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आजपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये आजपासून कॅशलेस (युपिआय) पेमेंट द्वारे तिकीट सेवा सुरु केली आहे. पुढील तीन महिन्याचा
आतमध्ये नऊशे ते बाराशे बस मध्ये प्रवाशी नागरिकांना बसेसचे लाईव्ह लोकेशन देऊ शकणार आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे पीएमपीएमएल च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रज्ञा पोतदार – पवार यांनी प्रास्ताविक केले.

युपीआय पेमेंटमुळे प्रवाशांना व महामंडळास खालीलप्रमाणे फायदे होणार आहेत.

1. तिकीट घेण्यासाठी सुट्या पैशांची समस्या संपुष्ठात येणार आहे.
2. वाहकाकडील कॅश व्यवहार कमी होऊन कामाची गतिशीलता वाढणार आहे.
3. महामंडळाकडील कॅश व्यवहार कमी होऊन बँकेत पैसे तत्काळ जमा होणार आहेत.
4. लवकरच महामंडळाचे मोबाईल अॅपद्वारे बस ट्रॅकिंग, प्रवासाचे नियोजन व मोबाईल टिकिटिंग सुविधा महामंडळाकडून सुरु करण्यात येणार आहे.
5. डिजिटल इंडिया या संकल्पनेला हातभार.

या पद्धतीने होणार कॅशलेस पेमेंट

1. वाहकाकडे ऑनलाईन क्युआर कोडची मागणी करणे.
2. क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करणे.
3. वाहकाकडून निर्माण होणारे आपले तिकीट प्राप्त करणे.