PMRDA Pune | Income Tax | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास मिळाली आयकरातून सूट | बचत होणाऱ्या निधीतून केली जाणार विकास कामे 

Categories
Breaking News पुणे

PMRDA Pune | Income Tax | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास मिळाली आयकरातून सूट | बचत होणाऱ्या निधीतून केली जाणार विकास कामे

PMRDA Pune | Incoe Tax | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (PMRDA) आयकरातून (Income Tax) सूट मिळाली आहे.  २०१७ ते २०२२ या पाच वर्षांसाठी प्रथमतः प्राधिकरणास सूट प्रदान करण्यात आली आहे. त्यातून बचत होणाऱ्या सुमारे एक हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी स्थानिक विकास कामांना उपलब्ध होऊ शकेल. अशी माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी तथा जन संपर्क अधिकारी  रामदास जगताप (PMRDA public relations officer Ramdas Jagtap) यांनी दिली. (PMRDA Pune | Income Tax)

​रामदास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाची स्थापना ३१ मार्च २०१५ रोजी झाली असून सदर प्राधिकरण हे शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता महानगर क्षेत्रातील बांधकाम परवानगी व जमीन संबंधी मिळणारा महसूल या दोन प्रमुख उत्पन्नाच्या स्वोतावर प्राधिकरण क्षेत्राचा पायाभूत विकास करण्याचे काम करीत आहे. (PMRDA pune news)

​त्या अनुषंगाने नागरिकांसाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणे हेच प्रमुख कार्य असल्याने आयकर भरणेपासून सवलत मिळावी असा विनंती अर्ज सन २०१७ मध्ये प्राधिकरणाने Central Board of Direct Taxes या Authority कडे दाखल केला होता. (PMRDA Marathi news)

​दरवर्षी सुमारे २५० ते २७५ कोटी रकमेची मागणी आयकर विभागाकडून करण्यात येत होती. दरम्यानच्या काळात प्राप्तीकर वसूलीच्या तगाद्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने CBDT कडे मा. महानगर आयुक्त राहुल महिवाल यांचे मार्गदर्शनाखाली बोरकर अँड बोरकर या फर्म तर्फे श्री. प्रथमेश बोरकर आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी, लेखा व वित्त विभाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी आवश्यक त्या कागदपत्र पुर्ततेसाठी परिश्रम घेतले व त्या अनुषंगाने दि.१०.०५.२०२३ चे नोटीफिकेशन द्वारे सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षांसाठी प्रथमतः प्राधिकरणास सूट प्रदान करण्यात आली आहे. त्यातून बचत होणाऱ्या सुमारे एक हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी स्थानिक विकास कामांना उपलब्ध होऊ शकेल. असे रामदास जगताप यांनी सांगितले. (Deputy collector Ramdas Jagtap)


News Title | PMRDA Pune | Income Tax | Pune Metropolitan Region Development Authority got exemption from income tax Development works to be done from the saved funds