Nanded City Township Property Tax | नांदेड सिटी मधील नागरिकांना PT ३ अर्ज भरून देण्याची आवश्यकता नसल्याचा माजी नगरसेवकांचा दावा 

Categories
Breaking News PMC social पुणे

Nanded City Township Property Tax | नांदेड सिटी मधील नागरिकांना PT ३ अर्ज भरून देण्याची आवश्यकता नसल्याचा माजी नगरसेवकांचा दावा

Nanded City Township Property Tax | नांदेड सिटीतील (Nanded City Pune) सदनिका धारकांना PT 3 फॉर्म (PT 3 Application Form) भरून देण्याची आवश्यकता नाही. असा दावा माजी नगरसेवक उज्ज्व केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच याबाबत पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाचे (PMC Property Tax Department) मोठे षडयंत्र असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. (Nanded City Township Property Tax)

माजी नगरसेवकांच्या निवेदनानुसार नांदेड सिटी मधील सदनिका धारकांचा कायदेशीर हक्क हिरावून घेतलेला आहे. आणि आता त्यांना त्यांचा अधिकार परत मिळेल असे दिसताना हा फॉर्म भरून आम्ही तुम्हाला टॅक्स कमी करू अशी लालूच दाखवलेली आहे. PT 3 फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला महानगरपालिकेने केलेली “कर आकारणी” मान्य आहे. असे त्यांना लेखी देऊन, “कायम स्वरूपी” कर तुम्हावर लादला जाईल. नांदेड सिटी मधील नागरिकांना आमचे आवाहन आहे महानगरपालिकेच्या कर आकारणी कर संकलन विभागाच्या या षडयंत्राला बळी पडू नका हा PT3 फॉर्म भरून देऊ नका. हा फॉर्म भरून दिला नाही तर तुम्हाला भविष्य काळामध्ये सवलत मिळणार नाही असा प्रचार चुकीचा आहे. नांदेड सिटी मधील नागरिकांना आमची विनंती आहे आपण संघटित व्हा आणि महानगरपालिकेला आम्ही दिलेल्या फॉर्ममध्ये हरकत नोंदवा इतर कुठलाही फॉर्म भरून देऊ नका. लोकसभेचे व विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर आपले आमदार भीमरावअण्णा तापकीर आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कानावर आम्ही हा विषय घालणार आहोत. तोपर्यंत कुणीही PT 3 फॉर्म भरून देऊ नका. असे आवाहन या नगरसेवकांनी नागरिकांना केले आहे. (Pune Municipal Corporation)

Nanded City Township Pune | नांदेड सिटी मधील नागरिकांना PT 3 अर्ज भरण्यासाठी महापालिकेकडून सुविधा

Categories
Breaking News PMC social पुणे

Nanded City Township Pune | नांदेड सिटी मधील नागरिकांना PT 3 अर्ज भरण्यासाठी महापालिकेकडून सुविधा

Nanded City Township Pune | नांदेड सिटी टाऊनशिप (Nanded City Sinhagad Road Pune) मधील नागरिकांना पुणे महापालिकेचा मिळकत कर (PMC Property tax) भरावा लागणार आहे. या लोकांना 40% सवलतीची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी पीटी 3 अर्ज (PT 3 Application) भरून द्यावा लागणार आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी महापालिके कडून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडून (PMC Property tax Department) देण्यात आली. (Nanded City Township Pune)
नांदेड टाऊनशिप चाळीस टक्के सवलतीबाबत शनिवार 23 डिसेंबर व रविवार 24 डिसेंबर तसेच शनिवार 30 डिसेंबर व रविवार 31 डिसेंबर रोजी मिळकत कर विभागाकडील प्रत्येक दिवशी दोन  एस आय (SI) नांदेड ग्रामपंचायत कार्यालयातील ऑफिसमध्ये सकाळी 10 ते 6 या कालावधीत पीटी थ्री फॉर्म स्वीकारण्यासाठी बसतील. स्वरहिवासीचा पुराव्यासह  नागरिक यांनी जागेवर PT 3 form भरून द्यावेत. स्वरहिवास जागेवर पुरावा सह pt 3  फॉर्म भरल्यास प्रत्यक्ष जागेवरच 40% सवलतीसह टॅक्स भरून घेतला जाईल. (Pune Municipal Corporation (PMC))
नागरिकांनी PT-३ अर्ज propertytax.punecorporation.org ह्या वेबसाईट वरून download करून त्यासोबत मतदान ओळखपत्र/पासपोर्ट/वाहन चालक परवाना/गॅस कार्ड/रेशन कार्ड/आधार कार्ड/सोसायटी ना हरकत प्रमाणपत्र यापैकी कोणतेही दोन कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे. असे टॅक्स विभागाकडून सांगण्यात आले.