Pune, Airport : Sharad Pawar : पुणे विमानतळाबाबत शरद पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती!

Categories
Breaking News Political पुणे

पुणे विमानतळाबाबत शरद पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती 

पुणे : जिल्ह्यातील नियोजीत विमानतळासंदर्भात या पंधरवड्यात संबंधितांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या इमारत पाहणीच्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पवार  म्हणाले – विमान तळासंदर्भात जागा निश्चित झाल्या, पण संरक्षण खात्याने हरकत घेतली. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबीत राहिला आहे. पुढील पंधरा दिवसात मी स्वतः, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी मिळून संरक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहोत. संरक्षण खात्याचे पुण्यात एक विभाग आहे. त्यांची विमाने रोज सकाळी सरावासाठी या भागातून जात असतात. शेवटी त्यांची भूमिका काय आहे हे समजून घ्यावी लागेल. आणि त्यानंतरच विमानतळा संदर्भातील मार्ग काढला जाईल.आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानतळ नेमके कोठे होणार हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. चाकणला होणार, पुरंदर तालुक्यात होणार का बारामती,दौंड व पुरंदर तालुक्यांच्या सिमेवरील गावांत होणार याबाबत परिसरात उलट-सुलट चर्चा चालू आहे.
 पवार  यांनी येत्या पंधरवड्यात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सुतोवाच केल्याने होणाऱ्या बैठकीकडे लक्ष वेधले आहे. बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या लगतच्या गावांसाठी सुपे हे मध्यवर्ती बाजार पेठेचे गाव असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. गावात विद्या प्रतिष्ठानचे मोठे शैक्षणिक संकुल उभारले जात आहे. त्या बरोबरच उपजिल्हा रूग्णालय, मोठी बाजार पेठ होऊ घातली आहे. याबाबत त्यांना विचारले असता. ते म्हणाले – हा विषय अजित पवारांचा आहे. आणि विमानतळाचा प्रश्न माझ्याशी संबधित आहे, असा खुलासा केला.

Pune Airport : पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज : पुरंदर विमानतळ प्रश्न समन्वयाने सुटावा

Categories
Political social पुणे महाराष्ट्र

पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज

: पुरंदर विमानतळ प्रश्न समन्वयाने सुटावा

: माजी आमदार मोहन जोशी

पुणे :शहरातील उद्योग, व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून पुरंदर विमानातळाचा प्रस्ताव मार्गी लावावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले आहे.

गेल्या काही वर्षात पुणे शहर वेगाने विस्तारते आहे. पुणे आणि परिसरात औद्योगिक क्षेत्रातील मोठे, मध्यम आणि लघु उद्योगांची संख्या २ लाखांहून अधिक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोनशे कंपन्या असून हा उद्योगही वाढत आहे. या अनुषंगाने व्यापारसुध्दा वाढत चालला आहे. अशा वेळी पुण्याची अन्य शहरे, राज्ये, परदेशातील २५ महत्वाची शहरे यांच्याशी कनेक्टीव्हीटी वाढणे जरुरीचे आहे.याकरिता पुण्यालगत आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे आहे.

गेली काही वर्ष खेड, पुरंदर अशा जागांच्या निश्चितीत गेली, आता विमानतळ प्रस्ताव बारगळल्यात जमा होणे पुण्यासाठी परवडणारे नाही. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय साधून लवकरात लवकर सर्वमान्यतोडगा काढावा आणि विमानतळाचे काम सुरू करावे, असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे. याबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.