Pune Metro Line 3 Project | पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला रौप्य पुरस्कार

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

Pune Metro Line 3 Project | पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला रौप्य पुरस्कार

Pune Metro Line 3 Project |पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत करण्यात येत असलेल्या पुणे  मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला (Pune Metro Line 3 Project) SKOCH संस्थेकडून राष्ट्रीय स्तरावरील ‘शहरी विकास’ श्रेणीतील रौप्य पुरस्कार मिळाला आहे. अशी माहिती पीएमआरडीए चे जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप (PMRDA PRO Ramdas Jagtap) यांनी दिली. (Pune Metro Line 3 Project)

SKOCH पुरस्कारासाठी 2023 या वर्षामध्ये विविध श्रेणीं अंतर्गत ३२० अर्ज प्राप्त झाले होते. हा पुरस्कार विषय तज्ञ आणि पीअर रँकिंग यांच्या संयुक्त रेटिंगवर आधारित होता. पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्प हा ज्युरी आणि पुरस्कारासाठीचे सहभागी या दोघांचेही लक्ष आणि रेटिंग मिळवण्यात यशस्वी झाला. (PMRDA Pune)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर (PPP) मॉडेलद्वारे हाती घेणेत आलेला आहे. (Pune metro line 3 News)

——

“पीएमआरडीएच्या स्थापनेपासून अत्यल्प कालावधीत हा प्रकल्प हाती घेणेत आला असून सदर प्रकल्प अत्यंत वेगाने व यशस्वीरित्या राबविणेत येत आहे. या प्रकल्पामुळे पुणे महानगर प्रदेश अंतर्गत सर्व कामांमध्ये गति मानता येणार असून आयटी आणि इतर संलग्न अर्थव्यवस्थांना चालना मिळणार आहे. SKOCH पुरस्कार त्याचीच साक्ष आहे.”

राहुल महिवाल, महानगर आयुक्त, पीएमआरडीए


“पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची पीएमआरडीएच्या वचनबद्धतेची कबुली आणि प्राप्त पुरस्कार भविष्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांसमोर एक आदर्श ठेवतो.”

विवेक खरवडकर, महानगर नियोजनकार, पीएमआरडीए


“प्रकल्पाच्या संरचनेतील नावीन्य, प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा वेग हे या पुरस्कारासाठीचे कारणीभूत मुख्य घटक होते.”

रिनाज पठाण, मुख्य अभियंता पीएमआरडीए


News Title |Pune Metro Line 3 Project | Silver award for Pune Metro Line-3 project