Pune Metro Line 3 Project | पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला रौप्य पुरस्कार
Pune Metro Line 3 Project |पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत करण्यात येत असलेल्या पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला (Pune Metro Line 3 Project) SKOCH संस्थेकडून राष्ट्रीय स्तरावरील ‘शहरी विकास’ श्रेणीतील रौप्य पुरस्कार मिळाला आहे. अशी माहिती पीएमआरडीए चे जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप (PMRDA PRO Ramdas Jagtap) यांनी दिली. (Pune Metro Line 3 Project)
SKOCH पुरस्कारासाठी 2023 या वर्षामध्ये विविध श्रेणीं अंतर्गत ३२० अर्ज प्राप्त झाले होते. हा पुरस्कार विषय तज्ञ आणि पीअर रँकिंग यांच्या संयुक्त रेटिंगवर आधारित होता. पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्प हा ज्युरी आणि पुरस्कारासाठीचे सहभागी या दोघांचेही लक्ष आणि रेटिंग मिळवण्यात यशस्वी झाला. (PMRDA Pune)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर (PPP) मॉडेलद्वारे हाती घेणेत आलेला आहे. (Pune metro line 3 News)
——
“पीएमआरडीएच्या स्थापनेपासून अत्यल्प कालावधीत हा प्रकल्प हाती घेणेत आला असून सदर प्रकल्प अत्यंत वेगाने व यशस्वीरित्या राबविणेत येत आहे. या प्रकल्पामुळे पुणे महानगर प्रदेश अंतर्गत सर्व कामांमध्ये गति मानता येणार असून आयटी आणि इतर संलग्न अर्थव्यवस्थांना चालना मिळणार आहे. SKOCH पुरस्कार त्याचीच साक्ष आहे.”
– राहुल महिवाल, महानगर आयुक्त, पीएमआरडीए
“पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची पीएमआरडीएच्या वचनबद्धतेची कबुली आणि प्राप्त पुरस्कार भविष्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांसमोर एक आदर्श ठेवतो.”
– विवेक खरवडकर, महानगर नियोजनकार, पीएमआरडीए
“प्रकल्पाच्या संरचनेतील नावीन्य, प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा वेग हे या पुरस्कारासाठीचे कारणीभूत मुख्य घटक होते.”
रिनाज पठाण, मुख्य अभियंता पीएमआरडीए
News Title |Pune Metro Line 3 Project | Silver award for Pune Metro Line-3 project