Hawkers | PMC | भाडे तत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही  | आजपासून जोरदार कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे

भाडे तत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही

| आजपासून जोरदार कारवाई

पुणे | शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडे तत्वावर देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने अशा पथारी धारकावर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. आजपासून अतिक्रमण विभाग जोरदार कारवाई करणार आहे. अशी माहिती महापालिका अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. अधिकृत व्यवसायिकांना सर्टिफिकेट देखील देण्यात आले आहे. मात्र हे फेरीवाले आपले दुकान भाडे तत्वावर चालवण्यास देत आहेत. ही गोष्ट नियमबाह्य आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. याबाबत उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले कि, अशा फेरीवाल्याना अगोदर समाज देण्यात आली आहे. आता विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करतील. त्यावेळी संबंधित दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील. त्यावरून लक्षात येईल कि दुकान भाडेतत्वावर आहे कि नाही. दुकान भाडेतत्वावर असेल तर तात्काळ संबंधित मालकाचा परवाना रद्द करण्यात येईल. आजपासून ही कारवाई तीव्र करण्यात येत आहे. असेही माधव जगताप म्हणाले.