Cabinet Meeting Decision | पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत वाढ

Categories
Breaking News Education Political social महाराष्ट्र

Cabinet Meeting Decision | पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत वाढ

Cabinet Meeting Decision | पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी (5 th, 8 th std) शिष्यवृत्तीच्या (Scholarship) रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting Decision)घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते.

उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती राहील. ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू राहील. संच एच आणि संच आय करिता २० हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. पाचवी नंतर ३ वर्षांकरिता आणि आठवी नंतर २ वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, गेल्या १३ वर्षात यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी असते.

सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १००० रुपये प्रति वर्ष तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल १५०० प्रति वर्ष एवढी संचनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येते.


News Title |Cabinet Meeting Decision | Increase in scholarship for Class V, VIII students

PMC: Scholarship : शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी उरले अवघे 10 दिवस 

Categories
Breaking News PMC पुणे

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी उरले अवघे 10 दिवस

: विद्यार्थी आणि पालकांना महापालिकेचे आवाहन

पुणे.  दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पालिकेच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. ती अवघ्या 10 दिवसात समाप्त होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी तात्काळ अर्ज भरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 – आतापर्यंत 6121 अर्ज प्राप्त

  10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती योजना आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना महानगरपालिकेकडून प्रदान केली जाते.  10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 हजार आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 25 हजार दिले जातात.  यासाठी खुला गट आणि मागास जातीचा गट, असे दोन गट करण्यात आले आहेत.  कुटुंबातील मुले जे स्थानिक नागरिक आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.  या शिष्यवृत्तीसाठी संबंधित कुटुंबाकडे मागील तीन वर्षांपासून रेशन कार्ड, मालमत्ता कर बिल, वीज बिलाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.  या शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची वेळ देण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे अर्ज भरता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  यासह, आपण संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी देखील संपर्क साधू शकता. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान आतापर्यंत सुमारे 6121 विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. तर अर्ज करण्याची मुदत अवघ्या 10 दिवसांत समाप्त होत आहे. त्यामुळे याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आतापर्यंत सुमारे 6121 विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. तर अर्ज करण्याची मुदत अवघ्या 10 दिवसांत समाप्त होत आहे. त्यामुळे याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.

          ज्ञानेश्वर मोळक, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.