MLA Sunil Tingre | सिद्धार्थनगर येथील नागरिकांचा वनवास कधी संपणार ? | सुनील टिंगरे यांचा सवाल | विधानसभेत आमदारांनी प्रश्‍नाला वाचा फोडली.

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

सिद्धार्थनगर येथील नागरिकांचा वनवास कधी संपणार : सुनील टिंगरे

|विधानसभेत आमदारांनी प्रश्‍नाला वाचा फोडली

 
राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान भू-संपादनासाठी आपली घरे तत्काळ खाली करणार्‍या विमाननगर येथील सिद्धार्थनगर मधील नागरिकांची पुणे महापालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. या लोकांना घरे कधी दिली जाणार? असा प्रश्‍न वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला.
या संदर्भात सुनील टिंगरे यांनी सांगितले कि वर्ष २००८-०९ च्या दरम्यान पुणे शहरात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. त्यामध्ये रस्ते, क्रीडांगण व क्रीडा संकुल यांचा समावेश आहे. यामध्ये लोहगाव एयरपोर्ट से नगररोड दरम्यानच्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. यावेळी पुणे मनपाचे आयुक्त म्हणून प्रविणसिंह परदेशी कार्यरत होते. परदेशी यांच्याकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची जवाबदारी देखील होती. विमाननगर येथील सिद्धार्थनगर मधील काही घरे रस्ता रूंदीकरणात बाधा आणत होती. त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन देवून तेथील १३८ घरे व १५ दुकानांची जागा संपादित केली गेली. नागरिकांनी देखील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी लगेचच आपल्या घरांचा ताबा दिला. त्यानंतर आता १४ वर्षे झाल्यावरण सुद्धा नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले नाही.
पुनर्वसनासाठी येथील नागरिक मनपा आणि झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण दोन्हीकडे हेलपाटे मारत आहेत, परंतु दोघांकडून एक-दूसर्‍याकडे बोटे दाखविली जात आहेत. बाधितांमधील काही लोक दगावली देखील आहेत. भगवान श्रीराम यांचा वनवास देखील १४ वर्षांनंतर संपला होता, या लोकांचा वनवास कधी संपणार? हा प्रश्‍न यावेळी सभागृहात उपस्थित केला. या सर्व लोकांना लवकरात लवकर घरे देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

पर्यायी रस्ता विकसित न केल्याने नागरिकांची अडचण

यावेळी आमदार सुनील टिंगरे यांनी लोहगाव परिसरातील पोरवाल रस्त्याची वाहतूक समस्येचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यांनी सांगितले कि अत्यंत रहदारी असणार्‍या पोरवाल रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी दोन-दोन तास नागरिकांना वाहतूक समस्येचा सामना करावा लागत आहे. पोरवाल रस्त्याला दो पर्यायी रस्ते आहेत, परंतु मनपा प्रशासनाकडून संबंधित रस्त्यांना डेवलप न केल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. आतापर्यंत अनेक समस्या वाहतूक कोंडीमुळे झाल्या आहेत. ट्रैफिक मुळे एक रूग्णाचा मृत्यु झाला आहे तर एक महिलेची रस्त्यावर गाडीमध्ये प्रसूती झाली आहे. चार वर्षोंपूर्वी लोहगावचा मनपा मध्ये समावेश झाला आहे, परंतु येथील समस्या जशाच्या तशा आहेत. रस्ते, पानी, डे्रनेज सगळ्या समस्या आहेत, परंतु ट्रैफिक जामची समस्या तातडीने सोडवून नागरिकांना लवकर दिलासा दिला जावा.