Stray Dogs Vaccination | भटक्या कुत्र्यांच्या लसीकरण आणि नसबंदी मोहिमेस अडथळा आणणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा इशारा

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

Stray Dogs Vaccination | भटक्या कुत्र्यांच्या लसीकरण आणि नसबंदी मोहिमेस अडथळा आणणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा इशारा

| महापालिका आरोग्य विभागाने दिली तंबी

Stray Dog Vaccination | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील भटक्या व मोकाट असणाऱ्या श्वानांची व मांजरांची (Stray Dogs and Cats) नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्याची मोहीम पुणे महानगरपालिके (PMC Pune)
कडून अनेक वर्षा पासून सुरु आहे. मात्र यात काही नागरिक अडथळा आणत आहेत. अशा नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार (PMC Health Chief Dr Bhagwan Pawar) यांनी दिला आहे. (Stray Dogs Vaccination)

 ही  मोहीम अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया (AWBI) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचे तंतोतंत पालन करून राबविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिका हद्दीतील भटक्या व मोकाट असणाऱ्या श्वानांची व मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी व Canine Control and Care Trust या दोन संस्थाची नेमणूक करण्यात आली आहे. या  संस्था पुणे महानगरपालिका हद्दीतील भटके व मोकाट श्वान व मांजर नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यासाठी पकडताना नागरीकांच्या कडून सदर
संस्थेच्या गाड्या रस्त्यामध्ये अडविण्यात येतात व नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यासाठी पकडण्यात आलेले श्वान सोडण्यासाठी अथवा नसबंदी शस्रक्रिया व लसीकरण झालेले श्वान व मांजर तेथेच सोडण्यात येऊ नये यासाठी कर्मचारी यांच्यावर दमदाटी करण्यात येते. ही बाब (नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण झालेले श्वान व मांजर पुन्हा त्याच जागी सोडण्यात येऊ नये) अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया (AWBI) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचे उल्लघन करणारी आहे. (Pune Municipal Corporation)
ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या नसबंदी शस्रक्रिया व लसीकरण करण्याच्या मोहिमे मध्ये बाधा निर्माण करणारी आहे.
तरी  सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पुणे महानगरपालिकेच्या वतीने सदर काम करणाऱ्या दोन्ही संस्थाच्या कोणत्याही गाड्याल रस्त्यामध्ये अडवून नसबंदी शस्रक्रिया व लसीकरण करण्याच्या मोहिमे मध्ये अडथळा निर्माण करू नये तसे केल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. (PMC Health Department)
——-
News Title |Stray Dogs Vaccination | Warning of action against citizens obstructing vaccination and sterilization drive of stray dogs Tambi was given by the Municipal Health Department