The Karbhari 2nd Anniversary | The karbhari च्या वाचकांना दुसऱ्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Categories
cultural social पुणे संपादकीय

The Karbhari 2nd Anniversary | The karbhari च्या वाचकांना दुसऱ्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली The Karbhari वृत्तसंस्था आज दोन वर्षाची झाली. आपण आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत. वाचकांच्या म्हणजे तुमच्या प्रेमाशिवाय ही वाटचाल अशक्य आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास हाच The karbhari चा आत्मा आहे. आपल्यासाठी ना कुठला सत्ताधारी, ना प्रशासन , ना कुणी उद्योजक, ना राजकारणी, आपला कारभारी. लोक हेच आपले कारभारी. कुठलेही कारभारीपण न मिरवता, आपण सरकारच्या, प्रशासनाच्या कारभारावर लक्ष ठेवतो आहोत. हे केवळ आणि केवळ वाचकांच्या भरवश्यामुळे शक्य झाले आहे.
        शक्य तेवढ्या संतुलित आणि समतोल बातम्या देण्याचा, सकारात्मक बातम्या देण्याचा आपला पहिल्यापासूनच प्रयत्न राहिला आहे. हाच अजेंडा आपण आगामी काळात देखील अबाधित ठेवणार आहोत. वाचकांचे प्रेम आणि त्यांनी दाखवलेला विश्वास हीच The Karbhari ची खरी ताकद आहे. आपण नेहमी सामान्य लोकांच्या बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न केला. हे करताना आपण कधीही प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने आसूड ओढले नाहीत. आपण नेहमी समतोल (Balance) साधला. याच आपल्या कौशल्यामुळे कितीतरी नवीन लोक आपल्याशी जुडले गेले. आगामी काळात अजून जुडतील.
     प्रत्येक वर्धापनदिन हा त्या संस्थेला काहीतरी शिकवत असतो. नवीन काहीतरी शिकवू पाहत असतो. आपणही प्रामाणिकपणे ते शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत. गेल्या दोन वर्षात आपण दिलेल्या बातम्यांमुळे आपण थोड्या तरी लोकांना न्याय देऊ शकलो याचा आनंद आहे. आपल्या बातम्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एवढेच नाही तर आपल्या प्रेमापोटी आपले चोखंदळ वाचक शुद्धलेखनातील चुका देखील सांगत असतात. त्यांचे मनापासून आभार. कारण अशा गोष्टीतून शिकतच आपली संस्था बळकट होणार आहे. आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना आपली जबाबदारी अजून वाढली आहे. आपल्या अधिकाराचा वापर करत असताना आपल्याला आपली कर्तव्ये देखील लक्षात ठेऊन काम करायचे आहे. त्यासाठी तुमची साथ महत्वाची आहे. तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा, तुमच्या भरवशाच्या कसोटीवर उतरण्याचा  आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.
पुनःश्च तुम्हां सर्वांना शुभेच्छा!
——-
संपादक 
The Karbhari